S M L

Exit Poll 2019 : तामिळनाडूमध्ये अम्मांच्या पक्षाला धक्का, काँग्रेस आणि द्रमुकला यश

तामिळनाडूमध्ये अम्मांच्या पक्षाला चांगलाच धक्का बसणार आहे. द्रमुक आणि काँग्रेसच्या आघाडीला 22 ते 24 जागा मिळतील, असा अंदाज आहे तर अण्णाद्रमुक आणि भाजपला 14 ते 16 जागा मिळतील, असं हा सर्व्हे सांगतो. इथे द्रमुक चांगली मुसंडी मारेल, असा अंदाज आहे.

News18 Lokmat | Updated On: May 19, 2019 07:55 PM IST

Exit Poll 2019 : तामिळनाडूमध्ये अम्मांच्या पक्षाला धक्का, काँग्रेस आणि द्रमुकला यश

दक्षिण भारतात तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत पण या राज्यात पैशाच्या अतिवापरामुळे वेल्लोरची निवडणूक रद्द करण्याची कारवाई झाली. त्यामुळे 23 मे ला तामिळनाडूमध्ये 38 जागांचे निकाल येणार आहेत. तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि काँग्रेसच्या आघाडीला 22 ते 24 जागा मिळतील, असा अंदाज आहे. अण्णाद्रमुक आणि भाजपला 14 ते 16 जागा मिळतील, असं हा सर्व्हे सांगतो.मागच्या निवडणुकीत सत्ताधारी अण्णाद्रमुकला 37 जागा मिळाल्या होत्या.

भाजपशी अण्णाद्रमुकशी युती

यावेळच्या लोकसभा निवडणुकासाठी या राज्यात भाजपने जयललितांचा अण्णाद्रमुक, पीएमके आणि डीएमडीके या पक्षांसोबत युती केली होती. त्यामुळे भाजपची ताकद वाढली.


काँग्रेसची द्रमुकशी युती

दुसरीकडे काँग्रेसने द्रमुक, एमडीएमके, व्हीएसके, सीपीआय आणि सीपीएम या पक्षांशी युती केली. या दोन महाआघाड्यांमध्ये तामिळनाडूची लढत होती.


Loading...

कमल हासन यांचा उदय

या दोन मुख्य आघाड्यांसोबतच तामिळनाडूमध्ये 2 नव्या पक्षांचाही उदय झाला. कमल हासन यांची मक्कल निधि मय्यम आणि शशिकला यांचा भाचा दिनकरन यांचा अम्मा मक्कल मुनेत्र कळगम हे ते दोन पक्ष.या दोन पक्षांनीही इथली राजकीय समीकरणं बदलली. कमल हासन यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळेही इथली निवडणूक चांगलीच गाजली.

2014 ची निवडणूक

2014 च्या लोकसभा निवडणुकीत जयललितांच्या अण्माद्रमुक पक्षाला 10 जागा मिळाल्या तर द्रमुकला 11 जागा मिळाल्या होत्या. एमडीएमतके आणि पीएमके या पक्षांना प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची इथे मर्यादित ताकद असल्याने या दोन्ही पक्षांना अण्णाद्रमुक आणि द्रमुक या पक्षांचाच आधार घ्यावा लागतो.

द्रमुकची पकड मजबूत

जयललिता यांच्या निधनानंतरचा अण्णाद्रमुक आणि एम. के. स्टॅलिन यांचा द्रमुक यांच्यातल्या लढतीकडे इथे सगळ्यांचंच लक्ष होतं.या लढतीत यावेळी काँग्रेस - डीएमके या युतीची स्थिती मजबूत दिसली.जयललिता यांच्या निधनानंतर पलानीस्वामी सरकारच्या विरोधात लाट पाहायला मिळाली.

==========================================================================

विदर्भात 'कमळ' उमलणार का? पाहा पहिल्या टप्प्याचा EXIT POLL VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2019 07:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close