धक्कादायक, तळ्यात पोहायला गेलेल्या मुलाच्या नाकातून निघाला मासा; VIDEO VIRAL

धक्कादायक, तळ्यात पोहायला गेलेल्या मुलाच्या नाकातून निघाला मासा; VIDEO VIRAL

नाकात मासा गेल्यामुळे कोंडला होता श्वास, नाकातून मासा काढण्यात डॉक्टरांना यश.

  • Share this:

पद्दूकोटाइ, 14 नोव्हेंबर: तळ्यात पोहायला गेलेल्या मुलाच्या नाकात मासा अडकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाकात मासा अडकल्यामुळे मुलाला श्वास घेणंही त्रासदायक झालं होतं. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ रुग्णालयात नेलं आणि मुलाच्या नाकातून मासा काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.

नेमका काय घडला प्रकार

तमिळनाडू इथल्या पद्दूकोटाइ इथे शाळा सुटल्यानंतर तळ्यात पोहायला गेला. पोहताना श्वास घेण्यासाठी अचानक त्रास होऊ लागला. त्यावेळी नेमकं काय होतंय हे समजलं नाही. त्याने कुटुंबियांना माहिती दिली. त्याला घरच्यांनी तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यावेळी पोहताना अचानक या मुलाच्या नाकात लहान मासा गेल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. डॉक्टरांना या मुलाच्या नाकातून मासा काढण्यात यश आलं आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतं आहे. या मुलगा सातवीत शिकत असल्याची माहिती मिळाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 14, 2019, 12:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading