मराठी बातम्या /बातम्या /देश /

तामिळनाडूत अपक्ष उमेदवाराची हवा! चंद्रावर सैर, हेलिकॉप्टर, कार आणि तीन मजली घर देण्याचं आश्वासन

तामिळनाडूत अपक्ष उमेदवाराची हवा! चंद्रावर सैर, हेलिकॉप्टर, कार आणि तीन मजली घर देण्याचं आश्वासन

Tamilnadu Election: तामिळनाडुत सध्या अपक्ष उमेदवार थुलम सरवनन यांच्या आश्वासनांची जोरदार चर्चा आहे. ही आश्वासनं पूर्ण करणार असा आत्मविश्वासही त्यांना आहे. वाचा नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे?

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 26 मार्च: तामिळनाडुत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. निवडणुकीला उभे असलेले उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं देत आहेत. मात्र तामिळनाडुतील मदुराई येथील अपक्ष उमेदवाराच्या आश्वासनांची सध्या जोरदार चर्चा आहे. भल्याभल्या पक्षाच्या उमेदवारांना जी आश्वासनं देता आली नाहीत, ती आश्वासनं अपक्ष उमेदवार थुलम सरवनन (Thuval Saravanan) यांनी जनतेला दिली आहेत. त्यांनी दिलेली आश्वासनं ऐकून अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. या आश्वासनांनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. प्रत्येक घरासाठी एक हेलिकॉप्टर, कार, तीन मजली इमारत आणि 100 दिवसांचा चंद्रावर सैर अशी एकाहून एक सरस आश्वासनं दिली आहेत. ही आश्वासनं पाहता त्या विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या मुलभूत गरजा संपल्या आहेत की काय, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नक्की येईल.

'मी प्रत्येक घराला एक हेलिकॉप्टर आणि कार देईन. त्यासोबत तीन मजली इमारत आणि चंद्राची सैर करण्याचं आश्वासन दिलं आहे. हे सर्व शक्य आहे. मात्र यासाठी थोडा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे', अपक्ष उमेदवार थुलम सरवनन यांनी हे आत्मविश्वासाने सांगितले आहे.या घोषणांसह निवडणूक जिंकल्यास प्रत्येक व्यक्तीला Apple फोन, गृहिणींना मदतीसाठी रोबोट, प्रत्येक कुटुंबाला एक होडी, विधानसभा क्षेत्रात थंडावा राहावा यासाठी 300 फूट उंचीचा कृत्रिम बर्फाचा डोंगर, एक अंतराळ अनुसंधान केंद्र आणि एक रॉकेट लॉन्च पॅड देण्याचाही घोषणाही केली आहे.

(हे वाचा-सायरस मिस्त्री यांना हटवण्याचा निर्णय योग्यच; टाटा समूहाला SC कडून दिलासा)

मदुराई विधानसभेसाठी 6 एप्रिलला मतदान होणार आहे. मदुराई दक्षिण विधानसभेसाठी सरवनन यांच्यासह 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 33 वर्षीय सरवनन यांनी निवडणूक लढवण्यासाठी 20 हजार रुपयांचं कर्ज घेतले आहे. त्यांचं निवडणूक चिन्ह हे कचरापेटी आहे. दूसरीकडे मोदाक्कुरिची विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या भाजपाच्या सीके सरस्वती यांचं आश्वासनही चर्चेत आलं आहे. सरस्वती यांनी गरजूंना मोफत गुडघ्याची शस्त्रक्रिया करुन देण्याचं आश्वासन दिले आहे.

(हे वाचा-Ripped Jeansच्या विधानावरुन भडकल्या स्मृती इराणी; म्हणाल्या, 'ते आपलं काम नाही')

निवडणुका आल्या की नेते मंडळी एकाहून एक सरस आश्वासनं देतात. मात्र प्रत्यक्ष निवडून आल्यानंतर किती सत्यात उतरतात, हे मायबाप जनतेला माहित आहे. आता तामिळनाडुतील जनता या आश्वासनांकडे कसं पाहते हे निवडुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

First published:

Tags: Helicopter, India, Politics, Tamilnadu, Vidhansabha