चेन्नई, 04 जून : तमिळनाडूच्या नागापट्टिनम जिल्ह्यात एक विचित्र प्रकार घडला. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी एका तरुणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टर हादरले. या तरुणाच्या पोटात डॉक्टरांना चक्क दारूची बाटली सापडली.
29 वर्षीय तरुणाच्या पोटात दुखायला लागल्यानंतर त्यांनं नागपट्टिनम रुग्णालयातील डॉक्टरांकडे गेला. या मुलाची तपासणी केल्यानंतर पोटात काहीतर असल्याची शंका डॉक्टरांना आली. त्यानंतर डॉक्टरांनी या मुलाला सीटी-स्कॅनिंग करण्यास सांगितले. मात्र त्याचे स्कॅनिंग रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर हैराण झाले. रिपोर्टमध्ये डॉक्टरांना या तरुणाच्या पोटात काचेची बाटली असल्याचं दिसून आलं.
शुक्रवारी या तरुणावर डॉक्टरांनी तब्बल 2 तास सर्जरी केली. त्यानंतर या तरुणाच्या पोटातून काचेची बाटली काढण्यात आली. या मुलाला याबाबत विचारल्यानंतर त्यानं डॉक्टरांनी दारूच्या नशेत त्यानं मलाशयातून बॉटल शरिरात टाकली. या घटनेनं डॉक्टरही हादरले.
वाचा-धक्कादायक! कंबर दुखायला लागली म्हणून झाला अॅडमिट, X-ray रिपोर्ट पाहून उडाली डॉक्टरांची झोप
तामिळनाडूचे हे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे जेव्हा लॉकडाऊन हळू हळू हटवण्यात आले आहे. लॉकडाऊन दरम्यान दारूची दुकाने बंद होती. मात्र नंतरच्या टप्प्यात राज्य सरकारांनी केंद्र आणि कोरोना प्रोटोकॉलच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दारूची दुकाने सुरू करण्यास सुरवात केली.
वाचा-VIDEO: जन्मत:च हात नसल्याने पायांनी चालवते गाडी,आनंद महिंद्रांकडून तरूणीचं कौतुक
लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने उघडली तेव्हा लोकांना बर्याच सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही. यासगळ्यातच या तरुणाचे प्रकरणं समोर आल्यानंतर सगळे हादरले.
वाचा-...आणि लिफ्टच्या दरवाजाला लटकली चिमुरडी; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हायरल
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.