Home /News /national /

चिनी व्हायरसला भारतीय औषध देईल टक्कर, तामिळनाडूच्या डॉक्टरचा दावा

चिनी व्हायरसला भारतीय औषध देईल टक्कर, तामिळनाडूच्या डॉक्टरचा दावा

जगभरात दहशत माजवणाऱ्या कोरोनाव्हायरसवर सध्या तरी कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. मात्र आपलं हर्बल औषध या कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरले, असा दावा भारतीय डॉक्टराने केला आहे.

    चेन्नई, 28, जानेवारी : डिसेंबर 2019 पासून चीनमध्ये आणि त्यानंतर आता जगभरात कोरोनाव्हायरसने (coronavirus) दहशत माजवली आहे. चीनमध्ये या व्हायरसने आतापर्यंत तब्बल 106 जणांचा जीव घेतला आहे. तर भारतासह इतर काही देशांमध्ये या व्हायरसचे संशयित रुग्ण आढळलेत. झपाट्याने पसरणाऱ्या या व्हायरसा रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या व्हायरसला मारक ठरणाऱ्या उपचारांचा शोध सुरू आहेत. अशातच या व्हायरसवर प्रभावी ठरेल असं औषध आपल्याकडे आहे, असा दावा भारतीय डॉक्टरने केला आहे. तामिळनाडूतील सिद्धा डॉक्टर थानीकासालम वेनी (Dr. Thanikasalam Veni) यांनी आपण कोरोनाव्हायरसवर हर्बल औषध शोधल्याचं सांगितलं आहे. डॉक्टर थानीकासालम वेनी हे चेन्नईतील रत्ना सिद्धा (Rathna Siddha) हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत, त्यांना सिद्धा आणि आयुर्वेदिक औषधांचा 25 वर्षांचा अनुभव आहे ANI वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. वेनी यांनी सांगितलं, "आम्ही जडीबुटींपासून औषध तयार केलं आहे. जे कोणत्याही व्हायरल तापाच्या उपचारासाठी प्रभावी आहे. कोरोना व्हायरसवर सध्या कोणतंही औषध नाही चीनच्या वुहानमध्ये या व्हायरसमुळे 50 जणांचा मृत्यू झाला आहे. या आजारावर उपचार कसे करावे हे अद्यापही तज्ज्ञांना समजत नाहीये. डेंग्यू (dengue), मल्टी ऑर्गेन फिव्हर (multi-organ fever) आणि अक्युट लिव्हर फिव्हर (acute liver fever) वर उपचारासाठी औषध वापरलं जातं.  जेव्हा आम्ही आमच्या औषधाने डेंग्यू व्हायरसवर उपचार केले तेव्हा प्लेटलेट्स कमी झालेला, एक्युट लिव्हर फेल्युअर, इम्युनिटी डेफिसिएंसी आणि पांढऱ्या रक्तपेशी कमी झालेला (व्हाइट ब्लड सेल - WBC) रुग्ण 24 ते 40 तासांत बरा झाला आहे. कोरोनाव्हायरसवरही हे औषध प्रभावी ठरेल, असा पूर्ण विश्वास मला आहे" राज्य आणि केंद्र सरकारसह चीनलाही गरज असल्यास मदत करण्याची इच्छा डॉक्टराने व्यक्त केली आहे. "आम्ही जागतिक आरोग्य संघटना आणि चीन सरकारला सांगू इच्छितो की आमचं औषध कोरोनाच्या तापाशी लढण्यासाठी सक्षम आहे. जर केंद्र आणि राज्य सरकारला गरज पडली तर मी या औषधासह तयार आहे. जर चीनलाही माझं योगदान हवं असेल, तर मी स्वत आपल्या औषधासह वुहान जायला तयार आहे", असं डॉ. वेनी म्हणाले. हेदेखील वाचा - भारतीयांना वाचवण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, चीनमधून 250 जणांची करणार सुटका कोरोनाव्हायरसवर HIV औषधांची चाचणी तर दुसरीकडे चीनमध्ये कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी HIV वर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची चाचणी केली जाते आहे. lopinavir and ritonavir जे Aluvia म्हणून ओळखलं जातं ही औषधं कोरोनाव्हायरसच्या रुग्णांना दिली जात आहेत, अशी माहिती AbbVie या औषधकंपनीने दिली आहे. रॉटटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधील आरोग्य अधिकारी या औषधांची मागणी करत आहेत. व्हायरसमुळे दिसणाऱ्या न्यूमोनियासारख्या लक्षणांवर उपचार म्हणून ही औषधं दिली जात आहेत. या व्हायरसवर उपचारासाठी लस बनवण्यासाठी वैज्ञानिकांचं प्रयत्न सुरू आहेत. चीनमध्ये या व्हायरसने 106 जणांचा बळी घेतला आहे. तर 4,515 जणांचा याची लागण झाली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Health, Treatment, Virus

    पुढील बातम्या