धक्कादायक! कोरोनानं घेतला देशात पहिला आमदाराचा बळी, वाढदिवशीच झाला मृत्यू

धक्कादायक! कोरोनानं घेतला देशात पहिला आमदाराचा बळी, वाढदिवशीच झाला मृत्यू

कोरोनाव्हायरसमुळे एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मृत्यूची ही पहिली घटना आहे.

  • Share this:

चेन्नई, 10 जून : देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता कोरोनामुळं एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. डीएमकेचे (DMK) आमदार जे अनबालागन (j anbazhagan) यांचा आज कोरोनामुळं मृत्यू झाला. याआधी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्यावर उपाचर सुरू करण्यात आले होते. 61 वर्षीय जे अनबालागन यांचा आजच 62वा वाढदिवस होता.

जे अनबालागन यांची प्रकृती रविवारी अचानक खालावली. याआधी त्यांना ऑक्सिझनवर ठेवण्यात आले होते. त्यांना रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटर रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. अनबालागन हे चेन्नई पश्चिम जिल्ह्यात द्रमुक सचिव होते. कोरोना विषाणूंमुळे एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मृत्यूची ही पहिली घटना आहे.

जे अनबालागन हे द्रविड़ मुन्नेत्र कड़गम (DMK) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. मुख्य म्हणजे कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्यासाठी जे अनबालागन विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. एवढेच नाही तर त्यांनी पक्षाच्या 'ओंदरीनाओव्हॉम कॅम्पेआग्न' (Ondrinaivom Campaiagn) मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.गेल्या आठवड्यात जे अनबालागन यांना कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अनबालागन यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडली. शुक्रवारी द्रमुकचे प्रमुख एमके स्टॅलिन आणि चेन्नईचे आरोग्यमंत्री सी विजयभास्कर हे अनबालागन यांना भेटायला गेले होते. स्टॅलिन यांनी ट्विटरवर पोस्ट लिहित अनबालागन यांना श्रध्दांजली वाहिली.

अनबालागन हे चेपक-ट्रिप्लिकेन विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. लॉकडाऊन दरम्यान त्यांनी मदत कार्यात सक्रियपणे भाग घेतला. 15 वर्षांपूर्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे या आजारपणात त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.

अनबालागन यांचे पूर्वीपासून द्रमुकशी संबंध होते. त्यांचे वडील जयरामन हे द्रमुकचे कार्यकर्ते होते. त्यामुळे अनबालागन यांच्या निधनामुळे द्रमुक पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

First published: June 10, 2020, 9:14 AM IST

ताज्या बातम्या