बोअरवेलमध्ये तीन दिवसांपासून अडकलाय चिमुकला, बचावकार्य युद्धपातळीवर

बोअरवेलमध्ये तीन दिवसांपासून अडकलाय चिमुकला, बचावकार्य युद्धपातळीवर

दोन वर्षांचा चिमुकला बोअरवेलमध्ये अडकला असून तो बेशुद्ध झाला आहे.

  • Share this:

चेन्नई, 28 ऑक्टोबर : तामिळनाडुतील त्रिची जिल्ह्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याला वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याबाबत बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांना म्हटलं की, 2 वर्षांचा चिमुकला बोअरवेलमध्ये बेशुद्ध झाला आहे. मात्र , त्याचा श्वास सुरू आहे. दुसऱ्या बाजूने मुलाला वाचवण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि राज्य पोलिस आणि स्थानिक प्रशासनासह अनेक पथकं काम करत आहेत.

बोअरमध्ये 2 वर्षांचा चिमुकला 26 फुटांवर अडकला होता. पण अचानक तो 70 फुट खोल घसरला. अधिकाऱ्यांनी त्याला दोरीच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश न मिळाल्यानं बोअरवेलला समांतर खुदाई सुरू कऱण्यात आली आहे.

बचावकार्य सुरु असताना रविवारी तामिळनाडुचे उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी मुलाच्या कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांना धीर दिला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही 2 वर्षांचा हा चिमुकला सुखरुप बाहेर यावा यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच राज्य सरकार बचाव कार्याची माहिती सातत्याने घेत आहे. या ठिकाणी राज्य सरकारचे अनेक मोठे अधिकारी उपस्थित असून तामिळनाडू सरकारमधील अनेक मंत्रीही घटनास्थळी आले आहेत.

चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पराभवाचं सांगितलं कारण, म्हणाले...

Published by: Suraj Yadav
First published: October 28, 2019, 1:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading