चेन्नई, 10 ऑगस्ट : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर दुकानापासून ते विवाह सोहळ्यांपर्यंत सर्वच ठप्प झालं. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी काही राज्यांमध्ये अद्याप लग्न समारंभाला परवानगी देण्यात आलेली नाही तर काही राज्यात हॉल बंद आहेत. अशा सगळ्यात परिस्थितीतही लग्न करायचे असेल तर काय करावे? असा प्रश्न सर्व सामान्यांपुढे आहे. मात्र यावर एका कला दिग्दर्शकानं तोडगा काढला आहे.
तामिळनाडू राज्यात अद्याप लग्न समारंभासाठी हॉलला परवानगी देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे तिरुपूर जिल्ह्याच्या उडुमलपेट येथे राहणाऱ्या कला दिग्दर्शकानं एक अजब युक्ती काढली. अब्दुल हकीम यांनी थेट मोबाइल वेडिंग हॉल सुरू केला आहे. यामुळे एका फोन कॉलवर तुमच्या घरपोच हॉल येतो. अब्दुल हकीम यांनी एका लहान ट्रकवर वेडिंग हॉल तयार केला आहे. त्यामुळे लग्नास इच्छुक असलेल्या कुटुंबाच्या फोनवर हा हॉल मंडपात पोहचतो.
वाचा-याला म्हणतात जुगाड! पठ्ठ्याने ऑडीची बनवली चक्क घोडागाडी, पाहा PHOTO
अब्दुल हकीम यांच्या कल्पनेमुळे लग्न समारंभही होऊ लागली आहेत, तसेच कारागिरांना रोजगारही मिळू लागला आहे. ट्रक सजवण्यासाठी साधारण 2 तास लागत असल्याचे अब्दुल यांनी द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
हा ट्रकमध्ये तयार करण्यात आलेला हॉल खऱ्याखुऱ्या वेडिंग हॉल सारखा आहे. यात मंचावर चढण्या-उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. मल्टी लाइट सिस्टी, कार्पेट आणि साउंड सिस्टिमही उपलब्ध आहे. मुख्य म्हणजे कोरोनाच्या परिस्थितीत लग्नासाठी स्टेजवर येणाऱ्या पाहुण्यांना सॅनिटायझर आणि मास्कही दिले जातात.
वाचा-प्रपोज करण्यासाठी घरात पेटवली मेणबत्ती, गर्लफ्रेंड हा बोलणार तेवढ्यात...
हकीम यांनी मुलाखतीत सांगितले की, कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला. त्यातून त्यांना मोबाइल वेडिंग हॉलची कल्पना सुचली. त्यानंतर एका महिन्याआधी त्यांनी हा हॉल तयार करण्यात सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी या मोबाइल हॉलमध्ये दोन विवाह आयोजित केले आहेत. या मोबाइल वेडिंग हॉलसाठी 25 हजार रुपये आकारले जातात. तर, केटरिंगसाठी 2 लाख रुपयांपर्यंत पॅकेज उपलब्ध आहेत. यात सरकारच्या नियमानुसार 50 पाहुण्यांसाठी जेवण दिले जाते.
वाचा-वेडिंग फोटोशूटवेळी झाला स्फोट, नवरीला घेऊन पळाला नवरा; Beirut Blast Video Viral
हकीम यांनी सांगितले की, ते सध्या 50 ते 100 किमीच्या परिसरातच सेवा देत आहेत. मात्र त्यांना शेजारच्या राज्यांतूनही फोन येत आहेत. मुख्य म्हणजे हकीम इतर राज्यातून येणारे ट्रक सजवून द्यायचेही काम करतात. हा मोबाइल वेडिंग हॉल कोणत्याही साधारण हॉलपेक्षाही कमी नाही आहे. येत्या काळात महाराष्ट्रातही अशा कल्पना येऊ शकतात.