मराठी बातम्या /बातम्या /देश /लॉकडाऊनमधील लग्नाची अनोखी गोष्ट; 2 States ला जोडणाऱ्या पुलावरच बांधली लग्नगाठ

लॉकडाऊनमधील लग्नाची अनोखी गोष्ट; 2 States ला जोडणाऱ्या पुलावरच बांधली लग्नगाठ

कोविड-19 च्या (Covid19) लॉकडाउनच्या (Lockdown) काळात हा पूल म्हणजे विवाह समारंभांसाठी हॉटस्पॉट बनला आहे. एका राज्यातला वर आणि दुसऱ्या राज्यातली वधू असलेले 11 विवाह गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये या पुलावर झाले.

कोविड-19 च्या (Covid19) लॉकडाउनच्या (Lockdown) काळात हा पूल म्हणजे विवाह समारंभांसाठी हॉटस्पॉट बनला आहे. एका राज्यातला वर आणि दुसऱ्या राज्यातली वधू असलेले 11 विवाह गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये या पुलावर झाले.

कोविड-19 च्या (Covid19) लॉकडाउनच्या (Lockdown) काळात हा पूल म्हणजे विवाह समारंभांसाठी हॉटस्पॉट बनला आहे. एका राज्यातला वर आणि दुसऱ्या राज्यातली वधू असलेले 11 विवाह गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये या पुलावर झाले.

    चेन्नई, 28 मे : पूल जसा दोन बाजूंना, दोन ठिकाणांना जोडतो, तसंच विवाह हा देखील मानवी आयुष्यात पुलाची भूमिका निभावतो. कुटुंबवत्सल आयुष्याकडे नेणारा हा पूल असतो. तसंच, दोन वेगवेगळ्या कुटुंबांना नातेसंबंधांनी जवळ आणणाऱ्या पुलाची भूमिकाही विवाह निभावतो. त्यामुळे विवाह (Marriage) एखाद्या खरोखरच्या पुलावरच झाला, तर तो या प्रतीकांचा सुरेख संगमच म्हणायला हवा. असा संगम सध्या तमिळनाडू (Tamilnadu) आणि केरळ (Kerala) या दोन राज्यांना जोडणाऱ्या पुलावर पाहायला मिळतोय. छिन्नर (Chinnar) नावाची नदी या दोन राज्यांना भौगोलिकदृष्ट्या वेगळं करते, पण तिच्यावरचा पूल त्यांना जोडतो.

    कोविड-19 च्या (Covid19) लॉकडाउनच्या (Lockdown) काळात हा पूल म्हणजे विवाह समारंभांसाठी हॉटस्पॉट बनला आहे. एका राज्यातला वर आणि दुसऱ्या राज्यातली वधू असलेले 11 विवाह गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये या पुलावर झाले. यंदाचा लग्नाचा हंगाम सुरू झाला असून, यंदाच्या लॉकडाउनमधला पहिला विवाह या पुलावर नुकताच पार पडला. निर्बंधांमुळे (Restrictions) एकमेकांच्या राज्यात जाणं शक्य नसल्यामुळे किंवा कठीण असल्यामुळे अनेक जोडप्यांनी हा मार्ग स्वीकारला आणि पुलावरच विवाह समारंभ पार पडले.

    केरळच्या इडुक्की जिल्ह्यातल्या मारायूरचा रहिवासी असलेला उन्नीकृष्णन आणि तमिळनाडूतल्या डिंडिगुल जिल्ह्यातल्या बाटलागुंडू इथली रहिवासी असलेली थंगामायिल यांच्याविवाहबंधनाची गाठ 24 मे रोजी छिन्नर नदीच्या पुलावर बांधली गेली. त्याच दिवशी उन्नीकृष्णनचा वाढदिवसही होता.

    गेल्या वर्षी क्वारंटाइनचे नियम कडक होते. त्यामुळे विवाह करणं अवघड होतं. यंदा कोविड-19 च्या टेस्ट्स करणं, वेळ आणि पैसे या दोन्ही बाजूच्या पार्टीला परवडण्यासारखं नाही, ही अडचण आहे. त्यावर मार्ग म्हणून पुलावर विवाहाचा पर्याय शोधला गेला.

    (वाचा - VIDEO : लग्नात नवरदेवाने केलं असं काही की आनंदाच्या भरात नाचायला लागली नवरी)

    केरळमध्ये प्रवेश करणाऱ्या कोणालाही कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट (Covid Negative Certificate) असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. पण टेस्ट्ससाठी खर्च खूप होतो आणि वेळही जातो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर उल्लेख केलेल्या विवाहासाठी वधूच्या कुटुंबातल्या लोकांना टेस्टकरता प्रत्येकी 2600 रुपये लागतील असं उदमालपेत्ताई येथे सांगण्यात आलं. म्हणजे 10 जणांनी जायचं ठरवलं असतं, तरी 26,000 रुपये लागले असते. वर पक्षाकडच्या मंडळींनी तमिळनाडूत जायचं ठरवलं असतं, तर टेस्ट वगैरे करून जाईपर्यंत खूप जास्त वेळ गेला असता. शेवटी उन्नीकृष्णनने पुलावरच विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला.

    (वाचा - VIDEO लग्नात मंत्रोच्चार करता करता दमले गुरुजी; तर वधु-वरांनी मंडपात केला प्रताप)

    हा विवाहसोहळा अगदी साधेपणाने पार पडला. त्या वेळी पुरोहितही उपस्थित नव्हते. दोन्ही राज्यांच्या पोलिस, आरोग्य, वन आणि जकात या विभागांचे अधिकारी आपापल्या राज्यांच्या बाजूने उपस्थित होते. सुरुवातीला वधूने तिचं कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट सादर केलं आणि तिने पुलावर प्रवेश केला. त्यानंतर वरानेही कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट सादर करून तो पुलावर आला. या दोघांचेही अगदीच मोजके नातेवाईक या वेळी उपस्थित होते. दोघांनीही परस्परांना माळा घातल्या आणि त्यांनी सप्तपदीची सुरुवात पुलावर चालून केली. वर आणि वधू पक्षाकडच्या नातेवाईकांनी आपापल्या राज्याच्या बाजूला राहून पुलावरचा हा छोटेखानी सोहळा पाहिला आणि नवविवाहितांना शुभेच्छा देऊन आपल्या घरचा मार्ग धरला.

    First published:
    top videos