मराठी बातम्या /बातम्या /देश /

पडद्यावरचे सुपरस्टार येणार राजकारणात एकत्र ? रजनी-कमल युतीत फक्त एका फोन कॉलचं अंतर

पडद्यावरचे सुपरस्टार येणार राजकारणात एकत्र ? रजनी-कमल युतीत फक्त एका फोन कॉलचं अंतर

 एकेकाळी तामिळ चित्रपट सृष्टीवर (Tamil Film Industry) राज्य करणारे रजनीकांत (Superstar Rajinikanth) आणि कमल हसन (Kamal Hassan) हे दोन सुपरस्टार आता राजकारणात देखील एकत्र येण्याची शक्यता आहे. कमल हसन यांनीच स्वत: य़ाबाबतचे संकेत दिले आहेत.

पुढे वाचा ...
  चेन्नई, 16 डिसेंबर : एकेकाळी तामिळ चित्रपट सृष्टीवर (Tamil Film Industry) राज्य करणारे रजनीकांत (Superstar Rajinikanth) आणि कमल हसन (Kamal Hassan)  हे दोन सुपरस्टार आता राजकारणात देखील एकत्र येण्याची शक्यता आहे. कमल हसन यांनीच स्वत:  याबाबतचे संकेत दिले आहेत. लोकांच्या हितासाठी कोणताही इगो बाजूला करण्याची तयारी असल्याचं कमल हसन यांनी सांगितलं आहे. काय म्हणाले कमल हसन? “राजकारणात नवी मंडळी खास हेतू ठेवून येत आहेत. मी देखील राजकारणात येण्याचा उद्देश स्पष्ट केला आहे. आम्हाला बदल हवा आहे. रजनीकांत यांचीही ती इच्छा आहे. त्यांचं धोरण अजून स्पष्ट नाही. त्यांच्या कोणत्याही एका शब्दाला संपूर्ण धोरण समजता येणार नाही. रजनीकांत यांनी एकदा त्यांचे धोरण स्पष्ट करावे. त्यानंतर आम्ही या विषयावर चर्चा करु, आमच्यामध्ये मैत्री आहे. आम्ही एकमेकांपासून फक्त एक फोन कॉल दूर आहोत. भविष्यात आवश्यकता भासली आणि शक्य झालं तर आम्ही एकमेकांना मदत करु, ’’ असे कमल हसन यांनी स्पष्ट केले. “युतीचा निर्णय रजनीकांत यांना घ्यायचा आहे. एकदा निर्णय झाल्यावर आम्ही एकत्र बैठकीत यावर चर्चा करु,” असंही कमल हसन यांनी सांगितले. हे वाचा-'इगो सोडा आणि आरेमध्ये काम करा', फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला तामिळनाडूचं राजकारण बदलणार? तामिळनाडूचं (Tamil Nadu)  राजकारण पुढील वर्षात बदलणार आहे. तामिळनाडू विधानसभेच्या पुढील वर्षी निवडणुका (Tamil Nadu Assembly Election)  आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुपरस्टार रजनीकांत  यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत 31 डिसेंबर रोजी त्यांच्या नव्या पक्षाच्या नावाची घोषणा करतील. त्याचबरोबर तामिळनाडूतले दुसरे सुपरस्टार कमल हसन  यांनी त्यांच्या मक्कल निधी मयम (MNM) पक्षाचा निवडणूक प्रचार सुरु केला आहे. पडद्यावरचे हे दोन सुपपस्टार राजकारणातही एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत रंगत निर्माण होऊ शकते. तसेच तामिळनाडूतल्या दोन प्रमुख द्रविड पक्षांनाही मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Tamilnadu

  पुढील बातम्या