मराठी बातम्या /बातम्या /देश /

...अन् 'गंगा'ने घडवला इतिहास! महापालिका निवडणुकीत ट्रान्सजेंडर महिलेचा विजय

...अन् 'गंगा'ने घडवला इतिहास! महापालिका निवडणुकीत ट्रान्सजेंडर महिलेचा विजय

तमिळनाडूतील (Tamil Nadu) वेल्लोर जिल्ह्यातील (Vellore District) 39 वर्षांच्या आर.गंगा (R. Ganga) या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या राज्यातील पहिल्या ट्रान्सजेंडर महिला ठरल्या आहेत.

तमिळनाडूतील (Tamil Nadu) वेल्लोर जिल्ह्यातील (Vellore District) 39 वर्षांच्या आर.गंगा (R. Ganga) या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या राज्यातील पहिल्या ट्रान्सजेंडर महिला ठरल्या आहेत.

तमिळनाडूतील (Tamil Nadu) वेल्लोर जिल्ह्यातील (Vellore District) 39 वर्षांच्या आर.गंगा (R. Ganga) या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या राज्यातील पहिल्या ट्रान्सजेंडर महिला ठरल्या आहेत.

वेल्लोर, 23 फेब्रुवारी: तमिळनाडूतील (Tamil Nadu) वेल्लोर जिल्ह्यातील (Vellore District) 39 वर्षांच्या आर.गंगा (R. Ganga) या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या राज्यातील पहिल्या ट्रान्सजेंडर महिला ठरल्या आहेत. गंगा यांनी वेल्लोर महापालिकेच्या (VCMC) प्रभाग 37 मधून द्रमुकच्या (DMK) तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांना या निवडणुकीत एकूण 2,131 मते मिळाली. अवघ्या 15 मतांनी त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे. पण गंगा यांचा हा विजय अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे, हे या विजयावरून दिसून येतंय. महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर गंगा यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. दरम्यान, तमिळनाडूत शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (TN urban polls) 19 फेब्रुवारी रोजी निवडणुका झाल्या. यामध्ये राज्यातील 21 महापालिका, 138 नगरपालिका आणि 489 नगरपंचायतींसाठी मतदान झाले होते.

हे वाचा-डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या गिफ्ट्समुळे महाग होतायेत औषधं, सुप्रीम कोर्टाचा दणका

सामाजिक कार्यात आघाडीवर

वेल्लोर येथील निवडणूक लढवणाऱ्या तीन ट्रान्सजेंडर महिलांपैकी गंगा एक आहेत. रंजिता आणि सबिना अशी अन्य दोघींची नावे आहेत. या दोघींना एनटीकेने (NTK) तिकीट दिले होते. निवडणुकीत विजयी झालेली गंगा वेल्लोर डिस्ट्रिक्ट ऑल जेंडर पॉझिटिव्ह नेटवर्क (Vellore District All Gender Positive Network) नावाची संस्था चालवतात. ही संस्था एचआयव्ही-एड्स आणि अपंग लोकांना मदत करते. यासोबतच गंगा साउथ इंडियन ट्रान्सजेंडर फेडरेशनच्या (South Indian Transgender Federation) राज्य सचिवही आहेत.

विविध विकास कामांचं केलं नियोजन

निवडणुकीपूर्वी गंगा यांनी द न्यू इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होतं की, त्या वेल्लोर ओल्ड टाऊनसाठी एक योग्य सांडपाण्याची लाइन तयार करण्याचे काम करतील, जेणेकरून शहरात पाणी तुंबणार नाही. तसंच त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं की, 'मी परिसरातील महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करण्याचं काम करेन. त्याचबरोबर युवकांसाठी उत्तम खेळाची मैदानं तयार करण्याचा माझा प्रयत्न राहील. परिसरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अखंड पुरवठा व्हावा, यासाठी माझ्याकडे विशेष प्लॅन आहे.'

हे वाचा-जिद्दीला सीमा नाही! फक्त YouTube बघून क्रॅक केली NEET; काश्मिरी युवकाचं यश

तमिळनाडू राज्यात महापालिकेच्या निवडणुकीत विजयी होणारी गंगा पहिली ट्रान्सजेंडर महिला आहे. त्यामुळे याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना गंगा या लोकांच्या विकासाच्या दृष्टीने कोणकोणती कामं करणार, त्या ज्या वार्डाचे प्रतिनिधित्व करत आहेत त्या वार्डात कोणकोणत्या योजना राबवणार, याकडे आता अनेकांचं लक्ष लागलं आहे. तसंच समाजाचा दृष्टिकोन आता हळूहळू बदलू लागला आहे, याचं उत्तम उदाहरण म्हणूनही आर. गंगा यांच्या विजयाकडे पाहिले जात आहे.

First published:

Tags: Tamil nadu