Home /News /national /

भयंकर! नदीवर आला कापसासरखा विषारी थर, VIDEO पाहून व्हाल हैराण

भयंकर! नदीवर आला कापसासरखा विषारी थर, VIDEO पाहून व्हाल हैराण

तमिळनाडू इथल्या मदुरई परिसरात एका नदीवर विषारी फेस आला आहे. याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पाण्याचा फवारा मारून हा फेस घालवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

    मदुरई, 28 नोव्हेंबर : कोरोना, चक्रीवादळ यासोबत आणखीन एक संकट डोकं वर काढत आहे ते म्हणजे प्रदूषणाचं. वाढणाऱ्या प्रदूषणामुळे नदीवर कापसासारखा विषारी थर आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा थर मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. याआधी यमुना नदीला विषारी फेस आल्यामुळे खऴबळ उडाली होती आणि आता पुन्हा एकदा दक्षिणेतील सर्वात प्रसिद्ध असलेल्या एक भागात ही घटना घडली आहे. कोरोनासोबतच तमिळनाडू आणि पदुचेरीवर निवार चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे. या चक्रीवादळामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आणि जनजीवन विस्कळीत झालं. इतकच नाही तर तमिळनाडू इथल्या मदुरई परिसरात एका नदीवर विषारी फेस आला आहे. याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पाण्याचा फवारा मारून हा फेस घालवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हे वाचा-भाईंचंद रायसोनी बँक घोटाळ्या प्रकरणी पोलिसांवर दबाव, अनेक राजकीय नेते रडारवर? येत्या 48 तासांत दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. अशा वेळी जर पुन्हा मुसळधार पाऊस पडला आणि पूरस्थिती निर्माण झाली तर नदीवर जमलेला हा विषारी थर सर्वत्र पसरला तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. अग्निशमन दलानं विषारी थरावर पाणी मारल्यानंतर फेस तयार झाला हा फेस कापसासारखा दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जलप्रदूषणामुळे हे झाल्याची चर्चा आहे मात्र हे नेमकं कशामुळे झालं याचं कारण अद्याप समोर आलं नाही.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Tamil nadu

    पुढील बातम्या