Home /News /national /

सुपरस्टार रजनीकांत ज्यांचा सल्ला ऐकतो ते तमिलरुवी मणीयन कोण आहेत?

सुपरस्टार रजनीकांत ज्यांचा सल्ला ऐकतो ते तमिलरुवी मणीयन कोण आहेत?

तामिळनाडूच्या (Tamil Nadu) राजकारणात नव्याने एंट्री केलेल्या सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या टीममध्ये कोण-कोण आहेत याची उत्सुकता आता शिगेला पोहलचलीय. नव्या ‘टीम रजनीकांत’मध्ये तमिलरुवी मणीयन (Tamilaruvi Manian) हे एक प्रमुख नाव आहे.

पुढे वाचा ...
    चेन्नई 4 डिसेंबर:  तामिळनाडूसह (Tamil Nadu) संपूर्ण देश ज्या घटनेची प्रतीक्षा करत होता, ती प्रतीक्षा आता संपली आहे. सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) आता 31 डिसेंबर रोजी त्यांच्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. रजनीकांत यांचा पक्ष तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे. तामिळनाडूच्या राजकारणात नव्याने एंट्री केलेल्या रजनीकांत यांच्या टीममध्ये कोण-कोण आहेत याची उत्सुकता आता शिगेला पोहलचलीय. नव्या ‘टीम रजनीकांत’मध्ये तमिलरुवी मणीयन (Tamilaruvi Manian)  हे एक प्रमुख नाव आहे. मणीयन यांचा दलबदलू इतिहास रजनीकांतचे राजकीय सल्लागार म्हणून मणीयन यांचे नाव तामिळनाडूच्या राजकारणात सध्या चांगलेच चर्चेत आहे. पक्षांतराचा मोठा इतिहास आणि वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेण्यासाठी मणीयन ओळखले जातात. ‘The Killers of Gandhi’ नावाची सीरिज लिहिल्यानंतर मणीयन सर्वात प्रथम चर्चेत आले होते. त्या सीरिजमध्ये त्यांनी कोणत्या एका व्यक्तीवर नाही तर थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS)  हल्ला चढवला होता. त्यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली होती. त्यानंतर मणीयन यांनी 2014 साली या भूमिकेपासून यु टर्न घेत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला. मणीयन सध्या वयाच्या सत्तरीत आहेत. त्यांनी मद्रास विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वकिली करण्याऐवजी त्यांनी राजकारणात उडी मारली. काँग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांचे राजकीय आयुष्य सुरु झाले. मात्र, ते काँग्रेसमध्ये फार काळ टिकले नाही. त्यानंतर त्यांचा पक्षांतराचा धडाका सुरु झाला. त्यांनी जनता पार्टी, जनता दल आणि लोकशक्ती पार्टीचे काम केले आहे. त्यांचा सर्वाधिक काळ तामिळ मनिला काँग्रेस (TMC) मध्ये गेला आहे. ते TMC चे जनरल सेक्रेटरी देखील होते. मणीयन यांनी 2009 साली पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. रजनीकांतशी आला संबंध तामिळ मनिला काँग्रेस (TMC) मधून बाहेर पडल्यानंतर मणीयन यांनी स्वत:ची Gandhiya Makkal Iyakkam  ही संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी दारुबंदीसह अनेक मुद्यांवर मागील काही वर्षांमध्ये काम केले आहे. सध्या कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट संबंध नसलेले मणीयन आता रजनीकांत यांचे सल्लागार बनले आहेत. विधानसभा निवडणुकीत रंगत तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका 2021 मध्ये होणार आहेत. आपला पक्ष विधानसभेच्या सर्व 234 जागा लढवणार असल्याचं रजनीकांत यांनी जाहीर केले आहे. सुमारे 60 ते 65 टक्के उमेदवार 50 वर्षाखालील तरुण असतील अशी घोषणाही त्यांनी केली आहे. आजवर दोन द्रविड पक्षांचा दबदबा राहिलेल्या तामिळनाडूच्या राजकारणात रजनीकांत यांचा पक्ष काय धमाका करतो हे पुढीलवर्षी होणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Tamil nadu

    पुढील बातम्या