Home /News /national /

गुंग होऊन TV सिरियल पाहणं पडलं 19 लाखांना; महिलेच्या नाकाखाली घडला विचित्र प्रकार

गुंग होऊन TV सिरियल पाहणं पडलं 19 लाखांना; महिलेच्या नाकाखाली घडला विचित्र प्रकार

घरात दोन महिला असूनही चोरट्यांनी घरातल्या दागिन्यांवर (Jewelery) डल्ला मारला आहे.

    तमिळनाडू, 29 डिसेंबर: तामिळनाडूतील (Tamil Nadu) कांचीपुरम (Kanchipuram) येथे झालेल्या चोरीची अजब बातमी समोर आली आहे. घरात दोन महिला असूनही चोरट्यांनी घरातल्या दागिन्यांवर (Jewelery) डल्ला मारला आहे. या चोरीच्या प्रकरणात चोरट्यांनी तब्बल 19 लाख रुपयांचे दागिनं पसार केलेत. कांचीपुरम येथे गुरुवारी रात्री मोठ्या आवाजात टीव्ही लावून मालिका पाहण्यात व्यस्त असलेल्या महिलेच्या घरात घुसून चोरट्यांनी 19 लाखांचे दागिने चोरले आणि आणि आरामात पसार झाले. पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, दोन्ही महिला रात्री उशिरा टीव्ही पाहत होत्या, त्यादरम्यान टीव्हीचा आवाज खूप मोठा होता. महिला टीव्ही पाहण्यात एवढ्या व्यस्त होत्या की त्यांच्या घरात चोर शिरल्याचे त्यांना कळलंही नाही. हेही वाचा-  महाराष्ट्रात तिसरी लाट निश्चित?, Covid टास्क फोर्सनं घेतला मोठा निर्णय पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, महिलांनी टीव्ही पाहण्यापूर्वी घराचा मुख्य दरवाजा बंद केला नाही. महिलांच्या या चुकीमुळे मुखवटा घातलेल्या चोरट्यांनी घरात घुसून महिलेला आणि तिच्या नातेवाईकाला चाकूच्या धाक दाखवून बंधक बनवलं आणि नंतर घर लुटलं. तामिळनाडूची ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स एकमेकांना घरी कसे सुरक्षित राहायचं आणि चुकूनही चोरी होऊ नये म्हणून गोष्टी कुठे लपवल्या पाहिजेत याची सिक्रेट शेअर करत आहेत. हेही वाचा-  Varities Of Tea : हिवाळ्यात आरोग्य राखण्यासाठी या प्रकारच्या चहा करा ट्राय, पाहा PHOTOS एका यूजरनं यावर कमेंट करताना लिहिले की, जर तुम्हाला जास्त सामान घरात कुठेतरी ठेवायचे असेल तर ते कपाट किंवा तिजोरीत नाही तर किचन किंवा बाथरूमच्या बॉक्समध्ये ठेवा. त्याच वेळी, एका यूजरनं म्हटलं की, प्रत्येकाने घरात प्रवेश करताच मुख्य दरवाजा लॉक करण्याचा सल्ला दिला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Tamilnadu

    पुढील बातम्या