Home /News /national /

Tamil Nadu Helicopter Crash : बाबांच्या पार्थिवावरील फुलांशी खेळू लागला चिमुरडा; VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल

Tamil Nadu Helicopter Crash : बाबांच्या पार्थिवावरील फुलांशी खेळू लागला चिमुरडा; VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल

तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे देशातील प्रत्येक नागरिकांना जबर धक्का बसला आहे.

  चेन्नई, 13 डिसेंबर : तमिळनाडू (Coonoor, Tamil Nadu) हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Air Force helicopter) शहीद पॅरा कमांडाे जितेंद्र कुमार वर्मा (Para Commande Jitendra Kumar Verma) यांच्यावर रविवारी मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh News) सीहोर जिल्ह्यात त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी भोपाळमधील सीहोरपर्यंत शहीदाचं पार्थिव घेऊन येणाऱ्या वाहनांवर लोकांनी ठिकाठिकाणी उभं राहून फुलांची उधळण केली. (Tamil Nadu Helicopter Crash boy was playing with flowers on fathers dead body Tears will come to your eyes after watching VIDEO ) शहिदाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांचा दीड वर्षांचा मुलगा चैतन्य बाबाच्या पार्थिवाशेजारी बसून होता. आणि निरागस असणारा तो चिमुरडा पार्थिवावरील फुलं काढून खेळू लागला. जितेंद्र यांचं पार्थिव सकाळी 11 वाजता दिल्लीहून भोपाळ एअरपोर्टवर आणण्यात आलं. येथे त्यांचं पार्थिक फुलांनी सजवण्यात आलं. आणि सैन्याच्या वाहनातून त्यांचं फुलांनी सजलेले पार्थिव रस्ते मार्गाने गावी आणण्यात आलं. साधारण दीड वाजता त्यांचं पार्थिव गावी पोहोचलं. हे ही वाचा-जीवन मरणाशी संघर्ष करणाऱ्या ग्रुप कॅप्टन वरुणसिंग यांचं हे पत्र होतंय VIRAL यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पार्थिवाला खांदा दिला. त्यांनी जवानाच्या कुटुंबीयांची भेटही घेतली. पत्नी सुनीला, वडील आणि भावाला सांत्वना दिली.

  तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी यांच्यासह 13 शूरवीरांचं निधन झालं. हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी सुमारे 19 सेकंदांचा एक व्हिडिओ समोर आला. ज्याचं आता विश्लेषण केलं जात आहे. व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर ढगांच्या गर्दीत शिरताना दिसत आहे आणि नंतर अचानक आगीच्या गोळ्याच्या रूपात खाली पडताना दिसतंय. आता अशा परिस्थितीत हा अपघात खराब हवामानामुळे झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Helicopter, Madhya pradesh

  पुढील बातम्या