तामिळनाडूच्या राज्यपालांनी महिला पत्रकाराचा थोपटला गाल, नंतर मागितली माफी !

तामिळनाडूच्या राज्यपालांनी महिला पत्रकाराचा थोपटला गाल, नंतर मागितली माफी !

  • Share this:

तामिळनाडू, 18 एप्रिल : पत्रकार परिषदेच्या दरम्यान तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी चक्क एका महिला पत्रकाराचा गाल थोपटण्याचं कृत्य केलंय. आपल्या या कृत्यानंतर राज्यपालांनी जाहीर माफी मागितलीये. प्रश्नाचं कौतुक करण्यासाठी आपण असं केलं होतं अशी सारवासारवही त्यांनी दिली.

राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून माफीनामा सादर केला. "मी त्या महिला पत्रकाराच्या गालाला असंच थोपाटलं होतं. ती माझ्या नाती सारख्या आहे. मी गेल्या 40 वर्षांपासून राजकारणात आहे. त्यांचा प्रश्ना चांगला होता म्हणून मी आपली नातं समजून त्यांचा गाल थोपटला. या कृत्यामुळे तुम्हाला दु:ख पोहोचले असेल याबद्दल मी खेद व्यक्त करतो."

महिला पत्रकार लक्ष्मी सुब्रमण्यम यांनी स्वत:राज्यपालांचं पत्र टि्वट करून त्यांचा माफीनामा स्विकारला पण राज्यपालांनी कौतुकाने माझा गाल थोपाटला ते मला अजूनही मान्य नाही असंही बजावलं. लक्ष्मी सुब्रमण्यम ह्या द विक या साप्ताहिक काम करतात.

नेमकं काय घडलं ?

देवांग आर्ट्स काॅलेजच्या प्राध्यापिका निर्मला देवी प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यासाठी राज्यपालांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या महिला प्राध्यापिकेवर आरोप आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्क वाढवून घेण्यासाठी महाविद्यालयातील अधिकाऱ्यांसोबत तडजोड करण्याचा सल्ला दिला होता. पोलिसांनी तक्रार दाखल करून त्यांना अटक केलीये. निर्मला देवी यांनी दावा केला होता की त्या राज्यपालांच्या निकटवर्तीय आहे. राज्यपाल पुरोहित हे या विद्यापीठाचे कुलगुरू आहे.

बनवारीलाल पुरोहित हे राजभवनात दाखल झाले होते. पत्रकार परिषदेच्या हाॅलकडे जात असताना तेव्हा पत्रकारांची मोठी गर्दी होती. त्यावेळी पुरोहित यांनी महिला पत्रकाराचा गाल थोपाटला.

या घटनेनंतर महिला पत्रकार लक्ष्मी सुब्रमण्यम यांनी टि्वट करून मी तामिळनाडूच्या राज्यपालांना असा कोणता प्रश्न विचारला जे त्यांनी माझी परवानगी न घेता माझ्या गालाला हात लावला."

विरोधीपक्ष द्रमुकने राज्यपालांसारख्या व्यक्तीने असं कृत्य करणे दुर्दैवी असून अशोभनिय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2018 06:25 PM IST

ताज्या बातम्या