चेन्नई 2 ऑगस्ट: तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची COVID-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर आता उपचार सुरु करण्यात आले आहेत. राज्यपालांच्या संपर्कात जे लोक आले होते त्यांचीही कोरोना चाचणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
याबाबत कावेरी हॉस्पिटलने मेडिकल बुलेटीनही जारी केलंय. पुरोहित यांना फारशी लक्षणे दिसत नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात आलं असून त्यांच्यावर डॉक्टरांचं पथक लक्ष ठेवून असल्याचंही हॉस्पिटलने म्हटलं आहे.
रविवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्विट केल्यानुसार - त्यांना कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसून येत होती. त्यांनी चाचणी केल्यानंतर चाचणी पॉझिटिव्ह आली.
मोदी सरकारमधील मंत्र्यांची धावपळ; अमित शहा पॉझिटिव्ह आल्याने लागण होण्याची भीती
त्यांनी पुढे लिहिले आहे की - त्यांची तब्येत ठीक आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात भरती करण्यात येत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
भाजपच्या नेत्यानेच दिलं असादुद्दीन ओवेसींना अयोध्येतल्या भूमिपूजनाचं निमंत्रण
यानंतर अमित शहा यांच्या संपर्कात आलेल्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. याबाबत स्वत: अमित शहा यांनी ट्विट करुन विनंती केली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला आयसोलेट करावे आणि चाचणी करुन घ्यावी असं आवाहन केलं आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.