Elec-widget

करुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, 2 जणांचा मृत्यू

करुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, 2 जणांचा मृत्यू

रमुक अर्थात द्रविड मुन्नेट्र कळगम पक्षाचे नेते आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणनिधी यांचं काल संध्याकाळी निधन झालं.

  • Share this:

तमिळनाडू, 08 ऑगस्ट : द्रमुक अर्थात द्रविड मुन्नेट्र कळगम पक्षाचे नेते आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणनिधी यांचं मंगळवारी संध्याकाळी निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी मरीना बीचवर ठेवण्यात येणार आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधींवर आज मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सकाळी सव्वा अकराच्या सुमाराला पंतप्रधान मोदींनी चेन्नईतल्या राजीजी हॉलवर जाऊन करुणानिधींचं अखेरचं दर्शन घेतलं. करुणानिधींचे सुपुत्र स्टालिन यांचं मोदींनी सांत्वन केलं. द्रमुकचे नेते आणि देशाचे माजी दूरसंचार मंत्री ए. राजाही यावेळी उपस्थित होते. मोदी यायच्या काही वेळ आधी स्टालिन यांना रडू कोसळलं..काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी देखील चेन्नईतल्या राजीजी हॉलवर जाऊन करुणानिधींचं अखेरचं दर्शन घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2018 07:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...