करुणानिधींच्या अंत्यसंस्काराच्या जागेवरून वाद, द्रमुकची कोर्टात धाव

करुणानिधींच्या अंत्यसंस्काराच्या जागेवरून वाद, द्रमुकची कोर्टात धाव

त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मरीना बीचच्या जागेवरून वाद निर्माण झालाय.

  • Share this:

चेन्नई,07 आॅगस्ट : द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा आणि तामिळनाडूचे 5 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या एम. करूणानिधी यांचं निधन झालंय. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहे. मात्र, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मरीना बीचच्या जागेवरून वाद निर्माण झालाय. तामिळनाडू सरकारने त्यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी गांधी मंडपमजवळ जागा दिली आहे.

मरीना बीचच्या जागेवरून राजकीय हालचालींना वेग आलाय. कायदेशीर बाब आणि मद्रास उच्च न्यायालयात खटले दाखल असल्यामुळे करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारासाठी मरीना बीचची जागा देण्यास असमर्थता दर्शवली आहे. या जागेच्या ऐवजी कामराज स्मारकाजवळील सरदार पटेल रोडवर जवळपास दोन एकर जमीन देण्यास सरकार तयार आहे. पण द्रमुक पक्षाने यावर नाराजी व्यक्त केलीये. त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. रात्री उशीर यावर सुनावणी होणार आहे.

करुणानिधी हे राज्याचे मुख्यमंत्री नाही. त्यामुळे मरीना बीचवर करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कार करण्यास मनाई करण्यात आल्याचं कळतंय.  तसंच मरीना बीचवर जयललिता आणि एमजी रामचंद्रन सारख्या मोठ्या नेत्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

करुणानिधी यांनी वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या महिनाभरापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर चेन्नईच्या कावेरी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचाराला योग्य प्रतिसाद मिळत नसल्यानं डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली होती. अखेर करूणानिधी यांची आज संध्याकाळी प्राणज्योत माळवली होती. करूणानिधी यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात आहे. दक्षिण भारतातल्या राजकारणाशिवाय साहित्य क्षेत्रातही करूणानिधी यांचं मोठं योगदान आहे.

करुणानिधी यांच्या निधनामुळे पंतप्रधान मोदींनी  श्रद्धांजली वाहिली. "कलाईनार करुणानिधींच्या निधनामुळे अतिशय दु:ख झालं...देशातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता..त्यांच्या जाण्यानं तळागाळातील जनतेशी जोडलेला नेता, दूरदृष्टी असणारा विचारवंत, प्रतिभावान लेखक आणि गरिबांसाठी लढणारा निष्ठावान व्यक्ती हरपलाय."

संबंधित बातम्या

पटकथा लेखक ते मुख्यमंत्री, करुणानिधींचा जीवनप्रवास

PHOTOS : 3 पत्नी आणि 6 मुलं, करुणानिधींच्या आयुष्यातील 8 गोष्टी

 

First published: August 7, 2018, 10:19 PM IST

ताज्या बातम्या