Home /News /national /

बापरे! मच्छिमारांच्या जाळ्यात सापडले चीनी चहाचे डब्बे, त्यात निघाली 230 कोटींची ही वस्तू

बापरे! मच्छिमारांच्या जाळ्यात सापडले चीनी चहाचे डब्बे, त्यात निघाली 230 कोटींची ही वस्तू

मासे मिळतील या आशेने सर्व मच्छिमार जमा झाले मात्र त्यांना सोनेरी रंगाचे बॉक्स मिळाले. त्यांनी जेव्हा त्याचा उलगडा झाला तेव्हा सगळे मच्छिमार आश्चर्य चकीत झालेत.

    चेन्नई 21 जून : तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातल्या मामल्लपूरम इथल्या मच्छिमारांना सोमवारी जाळ्यात मासे नाही तर मिळाल चीनी चहाचे डब्बे. मासे मिळतील या आशेने सर्व मच्छिमार जमा झाले मात्र त्यांना सोनेरी रंगाचे बॉक्स मिळाले. त्यांनी जेव्हा त्याचा उलगडा झाला तेव्हा सगळे मच्छिमार आश्चर्य चकीत झालेत. त्यात त्यांना 230 कोटींचं ड्रग्ज सापडलं. मामल्लपूरम हे चांगल्या माश्यांसाठी ओळखलं जातं. पट्टीचे खवय्ये याच ठिकाणाहून मासे खरेदी करतात. सोमवारी मात्र इथल्या मच्छिमारांच्या एका गटाला वेगळंच काही सापडलं. त्यांच्या जाळ्यात सोनेरी बॉक्स लागले होते. त्यावर चीनी आणि इंग्रजी भाषेत काही लिहिलेलं होतं. घाबरलेले मच्छिमार पोलिसांकडे गेले. तेव्हा त्यांना ते चीनी चहांचे बॉक्स असल्याचं कळलं. त्यानंतर त्यांनी जेव्हा ते बॉक्स उघडले तेव्हा त्यात ही पावडर आणि गोळ्या सापडल्या. पोलिसांनी त्याचा जेव्हा शोध लावला तेव्हा ते ड्रग्ज असल्याचं आढळून आलं. मेथाफेटामाइन (Methamphetamine) किंवा क्रिस्टर मेथ (Crystal Meth) असंही त्याला म्हटलं जातं. तब्बल 78 किलो हे ड्रग्ज मिळालं असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 230 कोटी रुपये एवढी होते. ड्रग्जची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीने हे बॉक्स समुद्रात टाकले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हेही वाचा -  शौचालयात पडलेला मोबाईल काढण्यासाठी उतरलेल्या बापलेकाचा करुण अंत Love Marriageकरून पत्नीला ढकललं वेश्याव्यवसायात, नकार देताच जिवंत जाळलं      
    First published:

    पुढील बातम्या