Home /News /national /

...आणि ती वाचली! 50 फूट खोल विहिरीत पडली हत्तीण, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा LIVE VIDEO

...आणि ती वाचली! 50 फूट खोल विहिरीत पडली हत्तीण, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा LIVE VIDEO

वेळोवेळी स्थलांतर करणाऱ्या प्राण्यांसाठी माणसांनी खुल्या ठेवलेल्या विहिरी किंवा मोठे खड्डे किती धोकादायक ठरू शकतात, हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल

    धर्मापुरी, 20 नोव्हेंबर: भारताच्या विविध भागात जसे वेगवेगळे प्राणी आढळून येतात, तशाच प्रकारे या प्राण्यांवर प्रेम करणारे देखील मोठ्या प्रमाणात आपल्या देशात आहेत. फक्त पाळीव प्राणीच नाही तर जंगली प्राण्यांवर देखील जीव लावणारे अनेक अवलिया तुम्हाला सापडतील. वन विभागाकडून देखील या प्राण्यांची वेळोवळी मदत केली जाते. हे प्राणी जर संकटात असतील तर त्यांच्या जीव वाचवण्यासाठी देखील अनेकजण मागेपुढे पाहत नाहीत. असाच काहीसा प्रकार एका हत्तीणीबरोबर घडला आहे. तामिळनाडूमधील धर्मापुरी (Dharmapuri, Tamil Nadu) याठिकाणी ही घटना घडली. रेस्क्यू ऑपरेशन करून विहीरीत पडलेल्या हत्तीणीला (Female Elephant) बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलं आहे. जवळपास 50 फूट खोल विहिरीत ही हत्तीण पडली होती. या दरम्यान तिला अन्न पुरवठा देखील करण्यात आला होता. आयएफएस ऑफिसर प्रविण कासवान (Parveen Kaswan) यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना त्या हत्तीणीचं आणि तिच्या इच्छाशक्तीचं देखील कौतुक केलं आहे. दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. त्या हत्तीणीला वाचवणाऱ्या सर्वांचे कौतुक होत आहे. प्रवीण कासवान यांनी अशी माहिती दिली की, 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी संपूर्ण दिवस हे रेस्क्यू ऑपरेशन करत होते. त्यांनी असे म्हटले की अशाप्रकारे रेस्क्यू ऑपरेशनसाठी प्रत्येक केसमध्ये वेगवेगळी रणनीती वापरावी लागते. त्याचप्रमाणे यामध्ये सहभागी असणाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले आहे. (हे वाचा-जॅग्वारने पाण्याच्या आता अशी केली शिकार, PHOTOS पाहून व्हाल हैराण) मात्र फॉरेस्ट ऑफिसर प्रवीण कासवान यांनी असे आवाहन देखील केले आहे की शक्यतो अशाप्रकारे विहिर उघडी ठेवू नका. त्यांनी आणखी एक ट्वीट करून म्हटले आहे की, 'हत्तींच्या स्थलांतरणाच्या मार्गांमधील मोकळ्या विहिरी आणि खड्डे या प्राण्यांसाठी मोठी समस्या आहे. दीर्घकाळ जगणारे प्राणी असल्याने ते अन्न आणि पाण्यासाठी लांब पल्ल्याने स्थलांतर करतात. त्यामुळे अशा विहिरी झाकणे किंवा सुरक्षितता भींत ठेवणे हे आपण कमीत कमी करू शकतो.'
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Viral video., Wild life

    पुढील बातम्या