VIDEO : सायकलस्वाराने मोडला नियम? जाणून घ्या ट्राफिक पोलिसांनी का अडवलं

सायकलस्वारानं हेल्मेट घातलं नाही म्हणून त्याला ट्राफिक पोलिसांनी अडवलं असं म्हणत अनेकांनी व्हिडिओ शेअर केला आहे. जाणून घ्या या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2019 03:40 PM IST

VIDEO : सायकलस्वाराने मोडला नियम? जाणून घ्या ट्राफिक पोलिसांनी का अडवलं

मुंबई, 19 सप्टेंबर : नवा वाहतुक कायदा लागू झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्यास मोठ्या प्रमाणावर दंडाची रक्कम भरावी लागते. या कायद्यानंतर खिल्ली उडवणारे अनेक मीम्स व्हायरल झाले. तर जोक्सही फिरू लागले. यातच एका सायकल चालकाला हेल्मेट न घातल्याबद्दल दंड केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका युजरनं सायकलवाल्या व्हिडिओवर कमेंट करताना म्हटलं आहे की, सर्वात जास्त पावत्या जो फाडेल त्याचं प्रमोशन होईल. खरंतर सायकल चालवणाऱ्याला अडवण्याचं कारण वेगळंच होतं.

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, सायकल चालवणाऱ्या माणसाला पकडणाऱ्या पोलिस उपनिरिक्षकानं सागितलं की, त्या चालकाला यासाठी थांबवलं कारण तो दोन हात सोडून सायकल चालवत होता. सायकलावाल्याचा व्हिडिओ तिथल्या इमारतीवरून रेकॉर्ड करण्यात आला आहे. या व्हिडिओत तामिळनाडुतील एरियुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक एस सुब्रामणी यांनी सायकल चालवणाऱ्याला पकडल्याचं दिसत आहे. त्यांनी सायकल लॉक केली आणि रस्त्याकडेला लावली.

दरम्यान, व्हिडिओत काही दुचाकीधारक हेल्मेटशिवाय जाताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. एस सुब्रामणी यांनी सांगितलं की, ही सोमवारची गोष्ट आहे. आम्ही सर्व गाड्यांना अडवत नाही. एखाद्या गाडीला अडवतो तेव्हा इतर गाड्या निघून जातात. यावेळी मुलगा दोन्ही हात सोडून सायकल चालवत होता. अशावेळी अपघात होण्याची शक्यता होती.

वाचा : दंड कसा करायचा? हेल्मेट नाही म्हणून अडवलं पण पोलिसांनाच पडला प्रश्न

पोलिसांनी सायकल बाजूला नेली मात्र ती जप्त केली नाही तसेच त्याच्यावर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई झाली नाही. सोशल मीडियावर होत असलेल्या सर्व चर्चा व्यर्थ असून त्यात तथ्य नाही. तर ज्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले त्यानं सांगितलं की, शर्टाचं बटन लावण्यासाठी हात सोडले होते.

Loading...

एस सुब्रामणी म्हणाले की, व्हिडिओत दिसेल की मुलाच्या शर्टाचं बटन उघडं आहे. थांबवल्यानंतरही त्यानं बटन लावलं नाही. तो सायकलवर स्टंट करत होता जे धोकादायक होतं. त्याला 10 मिनिटं थांबवण्यात आलं त्यानंतर समज देऊन सोडलं.

वाचा : 'माझी गाडी विकून खाल्ली हे आठवं आश्चर्य', मालकाचा RTO वर आरोप

वाचा : तरुणाचं ट्राफिक पोलिसांना आव्हान, आधी माझी गाडी चालवा नंतर पावती फाडा!

मुंबईच्या खड्ड्यांवर RJ मलिष्काचं नवं गाणं, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 03:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...