Home /News /national /

उलेमांना दुचाकी घेण्यासाठी सरकार देणार 50 टक्के अनुदान; मंदिराचा पैसा वळवल्याचा भाजपचा आरोप

उलेमांना दुचाकी घेण्यासाठी सरकार देणार 50 टक्के अनुदान; मंदिराचा पैसा वळवल्याचा भाजपचा आरोप

नवीन दुचाकी घेण्यासाठी उलेमांना तामिळनाडू सरकार 50 टक्के सबसिडी देणार आहे. उलेमांचं पेन्शनही दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरांचा पैसा वळवल्याचा भाजपचा आरोप आहे.

    चेन्नई, 19 फेब्रुवारी : नवीन दुचाकी घेण्यासाठी उलेमांना तामिळनाडू सरकार 50 टक्के सबसिडी देणार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी बुधवारी उलेमांसाठी जाहीर केलेली ही खास योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उलेमांचं निवृत्तीवेतनही पलानीस्वामी सरकारने दुपटीने वाढवलं. भारतीय जनता पक्षाने या निर्णयाला विरोध करताना राज्य सरकार मुस्लिमांचं लांगूलचालन करत असल्याचा आरोप केला आहे. उलेमांना निधी देण्यासाठी मंदिरांसाठीचा पैसा वळवल्याचा आरोपही भाजपने केला आहे. CNN News18 शी बोलताना भाजपचे नेते नारायण तिरुपती यांनी AIDMK चं सरकार मुस्लिमांचं लांगूलचान करत आहे. त्यासाठी हिंदू मंदिरांचा पैसा वळवला जात आहे, असा आरोप केला. "ही धर्मनिरपेक्षता नाही. सेक्युलर सरकारच्या नावाखाली मुस्लिमांना खूश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंदिरांमध्ये पुजाऱ्याचं काम करणारे हजारो हिंदू हलाखीच्या परिस्थितीत जगतात. त्यांच्यासाठी अशी कुठली निवृत्तीवेतन योजना नाही. उलेमांची पेन्शन मात्र दुप्पट करण्यात आली आहे." हज हाउससाठी 15 कोटींचा निधी पलानीस्वामी यांनी बुधवारी तमिळनाडूच्या विधानसभेत उलेमांचं पेन्शन दुप्पट करण्याची ही घोषणा केली. वक्फ बोर्डातर्फे उलेमा धार्मिक कार्य करत असतात. त्यांना 1500 रुपयांचं मासिक निवृत्तीवेतन एवढे दिवस मिळत होतं. ही रक्कम आता 3000 रुपये होणार आहे. तमीळ सरकारने उलेमांना  नवी दुचाकी घेण्यासाठी 50% सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय 15 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकार हाज हाउससाठी इमारतीसाठी देणार आहे. AIDMK च्या प्रवक्त्यांना भाजपच्या या आरोपांविषयी विचारलं असता ते म्हणाले. "ही नवी योजना नाही. उलेमांना पेन्शन सुरू होतंच. केंद्रानेही हाज यात्रेकरूंसाठीच्या निधीत वाढ केली आहे.  गेली काही वर्षं पेन्शन वाढवलं नव्हतं. ते आम्ही फक्त वाढवलं आहे. यासाठी कुठल्या एका धर्माचा पैसा इथे आणलेला नाही." ---------------- अन्य बातम्या राम मंदिराच्या जागेवर होते कब्रिस्तान? पुजाऱ्यांनी सांगितला हा पर्याय मेन्यूमधून हटवले बीफ, कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेरच वाटली बीफ करी
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Mandir, Tamilnadu

    पुढील बातम्या