VIDEO : तामिळनाडूला मिळाले नवे मुख्यमंत्री, शपथविधी कार्यक्रमात पत्नीला अश्रू अनावर

VIDEO : तामिळनाडूला मिळाले नवे मुख्यमंत्री, शपथविधी कार्यक्रमात पत्नीला अश्रू अनावर

तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) तब्बल 10 वर्षांनी द्रमुक (DMK) पक्षाची सत्ता आली आहे. DMK पक्षाचे प्रमुख एमके स्टॅलिन (MK Stalin) यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

  • Share this:

चेन्नई, 7 मे : तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) तब्बल 10 वर्षांनी द्रमुक (DMK) पक्षाची सत्ता आली आहे. DMK पक्षाचे प्रमुख एमके स्टॅलिन (MK Stalin) यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईतील राजभवानामध्ये शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बनावरीलाल पुरोहित (Banwarilal Purohit) यांनी स्टॅलिनला पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी स्टॅलिन यांच्या पत्नी दुर्गा स्टॅलिन (Durga Stalin) यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) वेगानं व्हायरल (Viral) होत आहे.

स्टॅलिन यांच्यासह 33 जणांनी यावेळी शपथ घेतली. 68 वर्षांच्या स्टॅलिननं त्यांच्या शपथ घेताना त्यांचं नाव मुथूवेल करुणानिधी स्टॅलिन असं वाचलं. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या त्यांच्या पत्नी दूर्गा स्टॅलिन आणि मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांना अश्रू अनावर झाले.

स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळात आता 34 सदस्य असून यामध्ये 15 नवे चेहरे आहेत. केवळ 2 महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. स्टॅलिन यांनी गृह मंत्रालय स्वत:कडेच ठेवले आहे. द्रमुक पक्षाचे माजी अध्यक्ष करुणानिधी यांच्या अनुपस्थितीमध्ये झालेल्या पहिल्याच विधानभा निवडणुकीत स्टॅलिन यांनी बाजी मारली आहे. ते पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले आहेत.

(वाचा : आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका; सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला पुन्हा फटकारलं )

नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक संध्याकाळी होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळातील काही खात्यांची फेररचना करण्यात येणार असून त्याला नवं नाव देणार असल्याचं स्टॅलिन यांनी सांगितलं आहे. उदाहरणार्थ कृषी मंत्रालयाचं नाव त्यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय असं असेल, असं स्टॅलिन यांनी जाहीर केलं आहे.

Published by: News18 Desk
First published: May 7, 2021, 4:07 PM IST

ताज्या बातम्या