• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Tamil Nadu Assembly Elections 2021 : माजी केंद्रीय मंत्र्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, प्रचार करण्यास 48 तासांची बंदी!

Tamil Nadu Assembly Elections 2021 : माजी केंद्रीय मंत्र्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, प्रचार करण्यास 48 तासांची बंदी!

द्रमुक पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा (A. Raja) यांच्यावर निवडणूक आयोगानं (Election commission) कारवाई केली आहे. आयोगानं राजा यांना 48 तास प्रचार करण्यास बंदी घातली आहे.

 • Share this:
  चेन्नई, 1 एप्रिल : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा (Tamil  Nadu Assembly Elections 2021) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे.  निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना द्रमुक (DMK) पक्षाला धक्का बसला आहे.  द्रमुक पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा (A. Raja) यांच्यावर निवडणूक आयोगानं (Election commission) कारवाई केली आहे. आयोगानं राजा यांना 48 तास प्रचार करण्यास बंदी घातली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी ( K. Palaniswami) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी राजा यांनी ही कारवाई केली आहे. निवडणूक आयोगानं यापूर्वी राजा यांना या प्रकरणात नोटीस बजावली होती. राजा यांनी त्याला 30 मार्च रोजी उत्तर पाठवले. पण आयोगानं त्यांचा युक्तीवाद फेटाळला होता. आयोगानं राजा यांना पुन्हा उत्तर देण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत दिली होती. त्यावर राजा यांनी आयोगाकडं अधिक मुदतीची मागणी केली होती. आयोगानं राजा यांची ही मागणी फेटाळत त्यांच्यावर कारवाई केली आहे. EC reprimands DMK leader A Raja for violation of model code of conduct, delists his name from list of star campaigner of DMK & debars him from campaigning for 48 hrs with immediate effect upon not finding his reply regarding his remarks over Tamil Nadu CM&his mother,satisfactory. pic.twitter.com/6gosJewxUm — ANI (@ANI) April 1, 2021 काय म्हणाले होते राजा? द्रमुक पक्षाचे खासदार असलेल्या ए. राजा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हंटले होते की, ' ते (पलानीस्वामी) चुकीच्या मार्गानं जन्मले आहेत. ए. राजाने द्रमुक पक्षाचे प्रमुख स्टॅलिन यांची प्रशंसा करत त्यांचा जन्म योग्य मार्गानं झाला असून पलानीस्वामी यांचा जन्म चुकीच्या मार्गानं झाला आहे,' अशी टीका राजा यांनी केली होती.' त्यांच्या या टीकेचे जोरदार पडसाद उमटले होते. 'द्रमुक पक्षाला महिलांबद्दल आदर नाही. राजा यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या स्वर्गवासी आईंचा अपमान केला आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. ( वाचा :रजनीकांत यांना मिळालेल्या फाळके पुरस्काराबाबतच्या एका प्रश्नानं जावडेकर भडकले ) निवडणूक आयोगानं या प्रकरणात असलेले सर्व पुरावे तपासल्यानंतर राजा यांना निवडणूक प्रचार करण्यास 48 तासांची बंदी घातली आहे. 'राजा यांचे वक्तव्य हे फक्त आक्षेपार्ह नसून यामुळे एका आईच्या मातृत्वाचा अपमान झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याने आदर्श निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन झालं आहे,' असं मत निवडणूक आयोगानं व्यक्त केलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: