मराठी बातम्या /बातम्या /देश /

दलित आमदारानं 19 वर्षांच्या ब्राह्मण मुलीशी केलं लग्न, वधूपित्यानं जीव देण्यासाठी अंगावर ओतलं पेट्रेल

दलित आमदारानं 19 वर्षांच्या ब्राह्मण मुलीशी केलं लग्न, वधूपित्यानं जीव देण्यासाठी अंगावर ओतलं पेट्रेल

पुजारी असलेल्या वधूपिता वडिलांनी या घटनेनंतर स्वत:वर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला

पुजारी असलेल्या वधूपिता वडिलांनी या घटनेनंतर स्वत:वर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला

पुजारी असलेल्या वधूपिता वडिलांनी या घटनेनंतर स्वत:वर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला

  • Published by:  Kranti Kanetkar

चेन्नई, 07 ऑक्टोबर : सत्ताधारी पक्षातील 36 वर्षांच्या दलित आमदारानं 19 वर्षांच्या ब्राह्मण मुलीसोबत विवाह केल्यानं गदारोळ झाला आहे. या घटनेनंतर विधूपित्यानं आमदारावर आरोप करत आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि एकच खळबळ उडाली. तमिळनाडूमधील सत्ताधारी पक्ष AIADMK चे दलित आमदार ए प्रभु यांनी 19 वर्षीय ब्राह्मण मुलीशी लग्न केलं. वधूपिता पुजारी असलेल्या वडिलांनी या घटनेनंतर स्वत:वर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र या घटनेमुळे तमिळनाडूमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दलित आमदाराने अल्पवयीन असताना 4 वर्षांपासून आपल्या मुलीला अडकवले असल्याचा आरोप या पुजार्‍याने केला आहे. तमिळनाडूमधील कल्लाकुरीची विधानसभा मतदारसंघातील AIADMK चे आमदार ए. प्रभू यांनी राहत्या घरी काही निवडक लोकांच्या उपस्थितीत 19 वर्षांच्या मुलीसोबत विवाह केला. या युवतीवर त्यांचं प्रेम होतं. या युवतीचे वडील मंदिरात पुजारी आहेत. तर वडिलांचा या दोघांच्याही लग्नासाठी सुरुवातीपासून विरोध होता.

हे वाचा-पुण्यात खूनाचं सत्र सुरूच, किरकोळ भांडणातून मित्रानेच घेतला मित्राचा जीव

या आमदारानं 15 व्या वर्षी माझ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं या दोघांमध्ये 17 वर्षांचं अंतर आहे. मागच्या 4 वर्षांपासून त्याने युवतीला आपल्या प्रेमात अडकवलं आहे. अवघ्या 15 वर्षांच्या या माझ्या मुलीला काही समजतंही नव्हतं आणि आता लग्न करून तिला अडकवलं आणि फसवल्याचा आरोप वधूपित्यानं केला आहे.

आमदार ए प्रभू यांनी पत्नी सौंदर्यासह एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आणि संपूर्ण प्रकरण स्पष्ट केले. प्रभू म्हणाले की आमचं 4 महिन्यांपासून एकमेकांवर प्रेम आहे. वधूपित्याकडे लग्नासाठी परवानगी मागितली होती मात्र त्यांनी विरोध केला. तर या प्रकरणी पोलिसांनी वधूपित्याच्या आत्मदहनाचा प्रयत्न थांबवला असून दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. दरम्यान या प्रकरणी वधू आणि वर दोघांचीही समंती असल्यानं आणि दोघांमधील प्रेमाला केवळ 4 महिनेच पूर्ण झाल्यामुळे लग्नाला कोणताही अडथळा नाही असं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणामुळे तमिळनाडूमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Tamilnadu