साता जन्माची साथ...! पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनं घरी आणला हुबेहुब पुतळा

साता जन्माची साथ...! पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनं घरी आणला हुबेहुब पुतळा

यापूर्वी कर्नाटकातील प्रसिद्ध व्यवसायिक श्रीनिवास गुप्ता यांनी आपल्या पत्नीचा मेणाचा तयार करून घेतला होता.

  • Share this:

हैदराबाद, 13 सप्टेंबर : प्रेम नक्की कशाला म्हणतात आणि कसं निभावतात ते यांच्याकडून घेण्यासारखं आहे. पत्नीनं साथ सोडली तरीही लग्नात दिलेलं वचन सात जन्म पती निभावताना दिसत आहे. कर्नाटकातील एका व्यापाऱ्यानं आपल्या पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतर घरी हुबेहुब तिचा मेणाचा पुतळा आणला होता आणि त्याची चर्चा जगभरात झाली होती. आता असाच प्रकार तेलंगणामध्ये घडला आहे.

तेलंगणा इथे 74 वर्षीय व्यक्तीनं आपली पत्नी आजारपणात साथ सोडून गेल्यानंतर त्यानं घरी हुबेहुब तिचा पुतळा आणला आहे. आपल्या पत्नीची कमतरता भासू नये जरी पत्नी आजारपणामुळे सोडून गेली असली तरी तिचा सहवास असावा ती जवळ आहे ही भावना कायम राहावी यासाठी या व्यक्तीनं पत्नीचा हुबेहुब पुतळा तयार करून घेतला आहे.

हे वाचा-ऑक्टोबरपासून कारमध्ये नवीन टेक्नोलॉजी, मोदी सरकारकडून लवकरच नियम लागू

S. Pitchaimaniammal यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं 67 व्या वर्षी मृत्यू झाला. यामुळे व्यावसायिक असणाऱ्या त्यांच्या पतीच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. ही भरून काढण्यासाठी त्यांनी पत्नीसारखा दिसणारा हुबेहुब पुतळा तयार करून घेतला. जेव्हा जेव्हा मी या पुतळ्याकडे पाहातो तेव्हा मला खूप बरं वाटतं, ती माझ्यासोबत असल्यासारखं. माझ्या व्यवसायात तिने मला मोलाची साथ दिली. असंही सेथुरमण (Sethuraman) यांनी आपली भावना व्यक्त केली.

याआधी कर्नाटकातील प्रसिद्ध व्यवसायिक श्रीनिवास गुप्ता यांनी आपल्या पत्नीचा मेणाचा तयार करून घेतला. श्रीनिवास गुप्ता यांच्या पत्नी माधवी यांचा 2017 साली तिरुपती बालाजीला जात असताना अपघाती मृत्यू झाला. नवीन घराचं स्वप्न पूर्ण झालं पण साथीला पत्नी नव्हती. अशा परिस्थित त्यांनी घरी पत्नीची कमतरता भासू नये म्हणून मेणाचा पुतळा तयार करून आणला.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 13, 2020, 4:59 PM IST
Tags: tamilnadu

ताज्या बातम्या