चेन्नई, 06 ऑगस्ट: तामिळनाडूमधील चेन्नईत एका 13 वर्षीय मुलीचा कोल्ड ड्रिंक प्यायल्यामुळे मृत्यू (Chennai girl dies after consuming soft drink) झाला आहे. पहिल्यांदा हे अजब वाटले पण या मुलीला दमा असल्याने डॉक्टरांनी कोल्ड ड्रिंक पिण्यास मनाई केली होती. तरीही तिने घरच्यांना चुकवून कोल्ड ड्रिंक घेतलं आणि तिला जिवाला मुकावं लागलं. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीचं नाव धारिणी (Chennai Girl Cold Drink Death) होतं. तिला दम्याचा आजार होता. डॉक्टरांनी तिला कोल्ड ड्रिंक पिण्यापासून मनाई केली होती. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी धारिणीने स्वतःच जवळच्या एका दुकानातून कोल्ड ड्रिंकची बाटली विकत घेतली होती. तिथेच ती कोल्ड ड्रिंक पीत असताना तिची मोठी बहीण अश्विनीने ते पाहिले. अश्विनीने धारिणीच्या हातातून कोल्ड ड्रिंकची (13 year old died after drinking cold drink) बाटली हिसकावून घेत तिला घरी घेऊन गेली. थोड्या वेळाने जेव्हा अश्विनी बाहेर निघून गेली, तेव्हा धारिणीने उरलेले कोल्ड ड्रिंक संपवले. यानंतर धारिणीला उलटीचा त्रास जाणवू लागला आणि ती तिथेच कोसळली. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत (Death due to cold drink) घोषित केले.
खाकीतील देव! या महिला पोलिसांनी रिक्षातचं केली पूरात अडकलेल्या गर्भवतीची प्रसूती
या घटनेनंतर चेन्नईतील शास्त्रीनगर पोलिसांनी या चिमुरडीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post-mortem) पाठवला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असं दिसून आलं, की तिच्या रेस्पिरेटरी सिस्टिममध्ये कोल्ड ड्रिंक गेल्यामुळे (Cold Drink went in Respiratory system) श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, न्यू इंडियन एक्स्प्रेसमधील एका बातमीनुसार मुलीच्या मृत्यूनंतर फूड सेफ्टी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी शोलावरम येथील कोल्ड ड्रिंक मॅन्युफॅक्चरिंग युनिटला टाळं (Sholavaram Cold Drink Manufacturing Unit Closed) ठोकलं आहे. अधिकाऱ्यांनी या कारखान्यातून 540 बाटल्या जप्त करुन त्या तपासणीसाठी पाठवल्या आहेत.
प्रियकरानं Video Call वरून दिलं हत्येचं ट्रेनिंग; लेकीनं जन्मदात्या आईचाच काढला काटा
हट्टापायी धारिणीला आपला प्राण गमवावा लागला. सामान्यपणे कोल्ड ड्रिंक किंवा कुठलेही खाद्य पदार्थ तयार करणाऱ्या कंपनीला सरकारकडून ते सेवन करण्यासाठी सुरक्षित असल्याचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं. तो खाद्य पदार्थ खाण्यासाठी किंवा पेय पिण्यासाठी योग्य आहे की नाही याचीही चाचणी करणं कायद्यानं बंधनकारक असतं. पण चेन्नईतल्या या घटनेत कोल्ड ड्रिंकमध्ये भेसळ असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस पुढचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, Tamil nadu