काश्मीरबद्दल मोदींच्या मास्टरस्ट्रोकनंतर तालिबान्यांनी पाकिस्तानला दिला दणका, शांततेचं केलं आवाहन

काश्मीरबद्दल मोदींच्या मास्टरस्ट्रोकनंतर तालिबान्यांनी पाकिस्तानला दिला दणका, शांततेचं केलं आवाहन

काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताने घेतलेल्या निर्णयावर पाकिस्तानने टोकाची प्रतिक्रिया दिली होती. आता मात्र तालिबान्यांनी शांततेचा पवित्रा घेतल्यामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे.

  • Share this:

काबुल, 9 ऑगस्ट : काश्मीरमधलं कलम 370 हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर अफगाणिस्तानमधल्या तालिबानी संघटनेने प्रतिक्रिया दिली आहे. अफगाण तालिबानचे प्रवक्ते जबीहउल्लाह मुजाहिद यांनी म्हटलं आहे, काश्मीरच्या मुद्द्याशी अफगाणिस्तानचा संबंध जोडण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. पण याचा अफगाणिस्तानशी काहीही संबंध नाही.

'अफगाणिस्तानचा वापर नको'

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शांतता राखावी, असंही आवाहन त्यांनी केलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षात अफगाणिस्तानचा वापर होऊ नये, असंही जबीहउल्लाह मुजाहिद म्हणाले. त्यांचा रोख पाकिस्तानमधले विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांच्या वक्तव्यावर होता. अफगाणिस्तानने लोक काबुलमध्ये शांत आहेत पण काश्मीरमध्ये मात्र रक्तपात होतोय. आम्हाला हे मंजूर नाही, असं शाहबाज शरीफ म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अफगाणी नागरिकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती.

पाकिस्तानला अमेरिकेच्या मदतीची होती अपेक्षा

पाकिस्तानने जर अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रक्रियेला उत्तेजन दिलं तर अमेरिका पाकिस्तानला काश्मीर मुद्द्यावर मदत करेल, असा पाकिस्तानचा होरा होता.

तालिबानी नेहमीच पाकिस्तानला आपले संरक्षक मानत आले आहेत. पाकिस्तानने तालिबान्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात खूप मदत केली होती.

भारत हा ढाण्या वाघ तर पाकिस्तान मांजर, मोदींच्या या मंत्र्यांनी ठणकावलं

पाकिस्तानची नाचक्की

काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध थांबवले, भारताच्या उच्चायुक्तांना परत पाठवलं आणि समझौता एक्सप्रेसही रद्द केली. एवढंच नव्हे तर याच मुद्द्यावरून पाकिस्तानने भारताला युद्धाची धमकीही दिली होती. आता मात्र तालिबान्यांनी शांततेचा पवित्रा घेतल्यामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे.

================================================================================================

माय लेकराला भांड्यात बसवून तरुणांनी वाचवलं, पाहा हा VIDEO

First published: August 9, 2019, 7:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading