राहुल गांधींनी भाजपच्या ट्रोल आर्मीला फटकारलं

राहुल गांधींनी भाजपच्या ट्रोल आर्मीला फटकारलं

"मी काही दिवसाकरीता सोनियाजींच्या रूटीन चेक-अपसाठी देशा बाहेर जात आहे. तरी माझी भाजपच्या सोशल मीडियातील माझ्या हितचिंतक मित्रानां अशी विनंती आहे की..."

  • Share this:

नवी दिल्ली, 28 मे : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी येत्या काही दिवसात सोनिया गांधींच्या रूटीन चेक-अपसाठी देशाबाहेर जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी अपल्या ट्विटर अकाउंटवरून भाजपच्या ट्रोल आर्मीचा चांगलाच समाचार घेतला आहे.

त्यांनी असं म्हटलं की "मी काही दिवसाकरीता सोनियाजींच्या रूटीन चेक-अपसाठी देशा बाहेर जात आहे. तरी माझी भाजपच्या सोशल मीडियातील माझ्या हितचिंतक मित्रानां अशी विनंती आहे की त्यांनी माझ्या परदेश वारीबद्दल जास्त मेहनत घेण्याची गरज नाही आहे. कारण लवकरच मी परत येणार आहे"

राहुल गांधी लवकरच मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार असून मंदसौर शहरात एका रैलीला संबोधित करणार आहेत. तसंच ते 6 जुन रोजी पोलीस फायरींगमध्ये मृत्यू झालेल्या  शेतकऱ्यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत. आणि इथूनच ते मध्य प्रदेश दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.

First Published: May 28, 2018 08:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading