ताजमहालच्या संरक्षणासाठी परदेशी तज्ज्ञांची मदत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला

ताजमहालच्या संरक्षणासाठी परदेशी तज्ज्ञांची मदत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला

आधी ताजमहालाचा रंग पिवळसर झाला होता आता तो तपकिरी आणि हिरवट होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज चिंता व्यक्त केली.

  • Share this:

01 मे : सगळ्यात मोठं पर्यटन स्थळ म्हणदे आग्र्याचा ताजमहाल. पण आधी ताजमहालाचा रंग पिवळसर झाला होता आता तो तपकिरी आणि हिरवट होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज चिंता व्यक्त केली. या ऐतिहासिक अमूल्य ठेव्याचे जतन करण्यासाठी देशातील आणि परदेशातील तज्ज्ञांची मदत घ्या. पण ताजमहाल वाचवा असं सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवलं आहे.

न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि एम. बी. लोकूर यांच्या खंडपिठाने याबाबत निरीक्षण नोंदवताना सांगितलं, 'तुमच्याकडे यासंदर्भातील तज्ज्ञ आहेत की नाही हे आम्हाला माहिती नाही. जर तुमच्याकडे तज्ज्ञ मंडळी असतील तर तुम्ही त्यांचा वापर करत नसावेत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. किंवा तुम्हाला ताजमहालची काळजी वाटत नाही. तुम्ही देशातील किंवा देशाबाहेरील तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

दरम्यान, ताजमहालच्या आसपाच्या परिसरात झालेली वृक्षतोड आणि प्रदुषणामुळे ताजमहालाच्या रंगावर परिणाम होत असल्याचे पर्यावरणअभ्यासक मेहता यांनी याचिकेतून न्यायालयासमोर आणले.

 

First published: May 1, 2018, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading