चांद्रयान 2 ने पाठवला चंद्राचा पहिला फोटो; तुम्ही ISROला कराल सलाम!

चांद्रयान 2 ने चंद्राचा पहिला फोटो काढला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2019 09:46 PM IST

चांद्रयान 2 ने पाठवला चंद्राचा पहिला फोटो; तुम्ही ISROला कराल सलाम!

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट: भारताच्या चांद्रयान 2ने दोन दिवसापूर्वीच म्हणजे 20 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. आता चांद्रयान 2 ने चंद्राचा पहिला फोटो काढला आहे. हा फोटो इस्रोने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पृथ्वीवरून काढण्यात येणाऱ्या चंद्राच्या फोटो पेक्षा हा फोटो वेगळा फोटो दिसत आहे. या फोटोचा तपशील इस्रोने शेअर केला आहे.

इस्रोने हा फोटो शेअर करताना दिलेल्या माहितीनुसार चंद्रापासून काही हजार किलो मीटर लांबून हा फोटो घेण्यात आला आहे. या फोटोत चंद्राच्या भूमीवरील काही महत्त्वाचे भाग देखील स्पष्टपणे दिसत आहेत. चांद्रयान 2 मधील विक्रम लँडरने 21 ऑगस्ट 2019 रोजी हा फोटो चंद्राच्या भूमीपासून 2 हजार 650 किलो मीटर अंतरावरून हा फोटो काढला आहे. इस्रोने या फोटोत चंद्रावरील दोन प्रसिद्ध ठिकाणांचा उल्लेख केला आहे. ज्यात ओरियंटल बेसिन आणि अपोलोचे स्थान दिसत आहे.

चार महत्त्वाचे टप्पे

चांद्रयान 2 आणखी 4 टप्पे आणि कक्षा पार करायच्या आहेत. इस्रोच्या मते चांद्रयान 2 ची दिशा वेग वेगळ्या दिवशी बदलली जाईल. नियोजित तारखेनुसार 21, 28, 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी चांद्रयान 2 ची दिशा बदलली जाईल. त्यानंतर चांद्रयान 2 चंद्रापासून केवळ 100 किलो मीटरवर असेल. 7 सप्टेंबर रोजी लॅडर विक्रम त्याच्या ऑर्बिटरपासून वेगळे होईल. त्यानंतर लॅडर विक्रम 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या जमीनीवर उतरेल.

ते 15 मिनिट असतील कळीचे

चांद्रयान 2 मोहिमेतील लँडिंगच्या वेळी 15 मिनिटे अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. चंद्राच्या भूमीपासून 30 किलो मीटर अंतरावर लँडिंगच्या आधी चांद्रयान 2चा वेग अंत्यत कमी केला जाईल. सॉफ्ट लँडिंग करण्यात भारत जर यशस्वी ठरला तर अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ चौथा देश ठरेल. अशी कामगिरी आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यांनी केली आहे.

चांद्रयान 2चा संपूर्ण प्रवास; व्हिडिओ पाहून तुम्ही कराल ISROला सॅल्यूट!

चंद्राच्या जमिनीवर उतरल्यानंतर 6 चाकाचे रोव्हर विक्रम लँडरपासून वेगळ होईल. यासाठी 4 तासांचा वेळ लागेल. हे ऑर्बिटर एक वर्षापर्यंत चंद्राच्या भोवती फिरणार होते. पण आता त्याचा कालावधी वाढवून दोन वर्ष करण्यात आले येणार आहे.

चांद्रयान-2ची वैशिष्ट्ये

1) चांद्रयान-2चे वजन 3.8 टन इतके आहे. आठ हत्तींच्या वजनाच्या इतके आहे हे वजन

2) यात 13 भारतीय पेलोड असतील त्यातील 8 ऑर्बिटर, 3 लँडर आणि 2 रोव्हर असतील. याशिवाय NASAचे एक पॅसिव्ह एक्सपेरिमेंट देखील असेल.

3) चांद्रयान-2 चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी मोहिम झालेली नाही.

4) भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान-2 एक उदाहरण ठरणार आहे.

5) या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिम ध्रुवावर पोहोचणार आहे. या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आजपर्यंत कोणत्याही देशाने केलेला नाही.

6) चांद्रयान-2 एकूण 12 भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे.

ईडी चौकशीत काय घडलं? राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी बोलताना EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: isro
First Published: Aug 22, 2019 09:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...