ताजमहालच्या परिसराला अजगरांचा विळखा, काय आहे यामागचं कारण?

ताजमहालच्या परिसराला अजगरांचा विळखा, काय आहे यामागचं कारण?

'ताजमहाल'ला कितीही वेळा भेट दिली तरी या जगप्रसिद्ध इमारतीबदद्लची उत्सुकता संपत नाही. पण आता या इमारतीबद्दल एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. ताजमहालच्या परिसरात मोठ्या संख्येने अजगर सापडतायत.

  • Share this:

आग्रा, 23 ऑक्टोबर : 'ताजमहाल'ला कितीही वेळा भेट दिली तरी या जगप्रसिद्ध इमारतीबदद्लची उत्सुकता संपत नाही. पण आता या इमारतीबद्दल एक विचित्र गोष्ट समोर आली आहे.

ताजमहालच्या परिसरात मोठ्या संख्येने अजगर सापडतायत. आगऱ्यामध्ये ताजमहालच्या जवळ असलेल्या हिरवाईच्या शोधात हे साप येतायत. त्यामुळे ते मनुष्य वस्तीच्या अगदी जवळ येऊन ठेपले आहेत.

काय आहे तज्ज्ञांचं मत?

आगऱ्याचे वन्यजीव विभागाचे वरिष्ठ अधिकारी उमेंद्र शर्मा यांच्या मते, ही आश्चर्याची बाब आहे. पण ताजमहालच्या परिसरात हिरवा पट्टा जास्त असल्यामुळे सापांचा इथे आढळ आहे.वनविभागाने ताजमहालच्या परिसरातलं वनक्षेत्र वाढवलं आहे. जेव्हा झाडी वाढली तेव्हा इथे ससे आणि उंदरांचं प्रमाण वाढलं. अजगरांना इथे मोठं खाद्य मिळाल्याने ते इथे मोठ्या प्रमाणात येऊ लागले. ताजमहालच्या मागच्या बाजूच्या गावात शेती आणि लोकवस्ती वाढली. यामुळेही अजगरांचा अधिवास कमी झाला.

(हेही वाचा : मोदी सरकारने घेतले 5 मोठे निर्णय, शेतकरी आणि सामान्य माणसांना दिवाळी भेट)

यमुनेकाठचा रस्ता

यमुनेकाठच्या रस्ता आणि ताजमहालच्या मध्ये जास्त अंतर नाही. याच रस्त्याने अजगर इथे येतात. हे अजगर सापडल्यावर त्यांना पकडून पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्याचं काम सर्पमित्रांची मदत घेऊन करावं लागतं. इथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे वनविभाग आणि वन्यजीव कार्यकर्ते यावर उपाय काढण्याचा प्रयत्न करतायत.

=======================================================================================

VIDEO : दिवाळीतही वरुणराजे चिंब भिजवणार, हवामान खात्याने दिला 'हा' इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 07:49 PM IST

ताज्या बातम्या