मुंबई, 24 मार्च: कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोक चिंतेत आहेत. त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावण आहे. या व्हायरससंदर्भात अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत. या आजाराची लक्षणं कोणती, नॉर्मल सर्दी-खोकल्या पेक्षा या कोरोनाची लक्षणं वेगळी कशी ओळखायची असे प्रश्न सर्वसामान्यांना पडता आहेत.
नॉर्मल सर्दी-खोकला, ताप आणि कोरोना व्हायरस या तिन्ही आजारांची लागण ही हवेत पसरणाऱ्या जंतूमुळे होते. तिन्ही आजार हवेमध्ये पसणाऱ्या जंतूमधून शरीरात प्रवेश करतात.
सर्दी-खोकला, ताप आणि कोरोना व्हायरस या आजारांमध्ये फरक काय?
कोरोना व्हायरस : कोरोना व्हायरसचं संक्रमण जलद होतं. ताप, कोरडा खोकला, अंगदुखी, अशक्तपणा ही कोरोनाची मुख्य लक्षणं आहेत. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला डोकेदुखीचा त्रास होतो. या व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर 14 दिवसांनीही कोरोनाचा ताप आल्याचं तपासणीमधून समोर येतं. म्हणजे पहिल्या 14 दिवसांमध्ये तपासणी केली तर कोरोना असल्याचं कदाचित कळणार नाही पण 24 दिवसांमध्ये कोरोनाची टेस्ट पोझिटीव्ह येऊ शकते.
सर्वसाधारण ताप : तुम्हाला व्हायरल ताप आला असेल तर कोरडा खोकला, अंगदुखी, थकवा जाणवतो. या फ्लूमध्ये सर्दी देखील होते. संसर्ग झाल्यानंतर 1 ते 4 दिवसांमध्ये आजार बळावतो. तर हा ताप आठवड्याभरात बरा होतो. जर तुम्हाला जास्त ताप येत असेल तर बरं होण्यासाठी जास्त लागतील.
सर्दी-खोकला : हवामानात बदल झाल्यानंतर सर्दी खोकला होतो. सर्दी-खोकला झाल्यास अनेकदा हलकासा तापदेखील येतो. यामध्ये देखील तुमचं शरीर दुखतं, डोकं दुखत. सर्दी-खोकला साधी औषधं- गोळ्या घेतल्यानंतर बरा होतो. हा बरा होण्यासाठी 5 ते 8 दिवस लागतात.
तुम्हाला झालेला सर्दी-खोकला 5 ते 7 दिवसांच्या वर राहिला किंवा ताप येत राहिला तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणं आणि तपासणी करणं आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य टेस्ट करून उपचार घेतल्यास कोरोना सारखा आजार देखील बरा होतो.
अन्य बातम्या
Coronavirus पासून वाचण्यासाठी हँड सॅनिटायझरचा अतिवापर, इतर आजारांना आमंत्रण