पश्चिम बंगालमधील श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याला काळं फासलं

पश्चिम बंगालमधील श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याला काळं फासलं

भाजप आणि डाव्यांमध्ये पुतळ्यांचं राजकारण आता चांगलंच पेटलं. जाधवपूर विद्यापीठातील शामाप्रसाद मुखर्जींचा पुतळ्याला अज्ञातांनी काळं फासलं.

  • Share this:

पश्चिम बंगाल, 07 मार्च : भाजप आणि डाव्यांमध्ये पुतळ्यांचं राजकारण आता चांगलंच पेटलं. जाधवपूर विद्यापीठातील शामाप्रसाद मुखर्जींचा पुतळ्याला अज्ञातांनी काळं फासलं. काल त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडला होता.

दक्षिण त्रिपुराच्या सबरूम मोटर स्टँडमध्ये लेनिन यांचा पुतळा तोडण्यात आलाय. लेनिन यांचा पुतळा तोडण्याची ही दुसरी घटना आहे.  सोमवारी दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बेलोनियामध्ये रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता व्लादिमीर लेनिनचा पुतळा भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोडला. 'भारत माता की जय'च्या घोषणा देत भाजप समर्थकांनी बुलडोझरच्या सहाय्याने हा पुतला तोडला असून बुलडोझर चालकाला दारू पाजण्यात आल्याचं कळतंय. पोलिसांनी बुलडोझर चालकाला अटक केलीये तर बुलडोझर सील करण्यात आले आहे.

भाजपच्या या कृत्याचा सर्व स्तरांतून निषेध झाला, संपूर्ण त्रिपुरात हिंसाचार उफाळलाय. 13 पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2018 11:08 AM IST

ताज्या बातम्या