News18 Lokmat

मोदी सरकारला लवकरच मिळणार 'ब्लॅक मनी'ची माहिती, प्रक्रिया सुरू

News18 Lokmat | Updated On: Feb 5, 2019 08:50 AM IST

मोदी सरकारला लवकरच मिळणार 'ब्लॅक मनी'ची माहिती, प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : काळ्या पैशांविरोधात सरकारने उघडलेल्या मोहिमेला आता आणखी जोमाने सुरूवात होणार आहे. स्विस बँकांमध्ये असलेल्या भारतीय खात्यांची माहिती लवकरच भारत सरकारला मिळू शकते. याबाबत स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ऑगस्ट 2008 मध्ये स्वित्झर्लंडच्या फेडरल कोर्टाच्या आदेशानंतर खात्यांची माहिती देणं बंद केलं होतं. दीड महिन्यापूर्वी पहिल्यांदा वैयक्तिक भारतीय खातेधारकांना नोटिस पाठवण्यात आली आहे. त्यात म्हटलं आहे की, दोन्ही देशांमध्ये केलेल्या करारनुसार भारताकडून बँक आणि खात्यांचा तपशिल मागवण्यात आला आहे. यामध्ये एक एप्रिल 2011 पासून खात्यांची माहिती देण्यास सांगितले आहे.

बँक खात्यांची माहिती देण्याच्या आदेशाबरोबरच भारतीय खातेधारकांना सहमती पत्रही भरण्यासाठी देण्यात आसं आहे. यात म्हटलं आहे की, भारतीय अधिकाऱ्यांनी जी माहिती मागितली आहे ती देण्यास आमची परवानगी आहे.

भारताला 2011 मध्ये फ्रान्सकडून स्वित्झर्लंडच्या बँकेतील 628 भारतीय खातेधारकांची नावे मिळाली होती. त्यानंतर 2015 मध्ये 1195 नावे समजली होती. त्याचबरोबर 2006-07 पर्यंत स्विस बँकांमध्ये भारतीय खातेधारकांचे जवळपास 25 हजार कोटी रुपये असल्याचे समोर आलं होतं. यात भारतात राहणाऱ्या 85 लोकांच्या खात्यात कमीत कमी 10 लाख डॉलर्स जमा होते.

यापूर्वी फ्रान्सने एचएसबीसी बँकेतील जवळपास 700 भारतीय खात्यांची माहिती ऑगस्ट 2011 ला दिली होती. त्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये सरकारने याबाबत हालचाल सुरू केली होती.

Loading...

#MustWatch आजचे टॉप 5 न्यूज व्हिडिओ पाहा 2.30 मिनिटांत


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2019 08:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...