Swiggy ने सुरू केली दारुची होम डिलिव्हरी; ऑर्डर करण्यासाठी अनिवार्य असतील हे नियम

Swiggy ने सुरू केली दारुची होम डिलिव्हरी; ऑर्डर करण्यासाठी अनिवार्य असतील हे नियम

महाराष्ट्रात दारुच्या होम डिलिव्हरीबाबत अनेक फसवणुकीच्या घटना समोर आल्या होत्या

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मे : फूड डिलिव्हरी अॅप स्विगीने एक दिवसांपूर्वी तब्बल 1100 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते. मात्र गुरुवारी कंपनीने दारुची होम डिलिव्हरी सुरू करणार असल्याची माहिती दिली. कंपनीने आजपासून ही सेवा झारखंडमधील रांची शहरात सुरू केली आहे. स्विगीने दावा केला आहे की राज्य सरकारकडून आवश्यक मंजुरी देण्यात आली आहे.

दुसऱ्या राज्यातही दारुच्या होम डिलिव्हरीची तयारी

झारखंडनंतर दारुची ऑनलाईन ऑर्डर आणि होम डिलिव्हरीसाठी स्विगी अन्य राज्य सरकारसोबत चर्चा करीत आहे. कंपनीचं म्हणणं आहे की जर राज्यांकडून परवानगी मिळाली तर ते तातडीने सेवा सुरू करू शकतात. कंपनीजवळ सर्व आवश्यक लॉजिस्टिक्स इन्फ्रास्टक्चर आणि देशभरात विविध परिसरात पोहोचले आहेत.

दारुची होम डिलिव्हरीबाबत नियम लागू करण्यात आले आहे. ज्यामध्ये वयाची तपासणी आणि इतर काही बाबींचा समावेश आहे. ग्राहकांना आपले ओळखपत्र अपलोड करुन वयाची नोंदणी करता येऊ शकते. यानंतर त्यांना सेल्फी पाठवावे लागेल. तो फोटो कंपनी आर्टिफिशयल इंटेलीजन्स सिस्टमच्या (AI Systems)  मार्फत वेरिफाय करेल.

नियमांनुसारच दारुची करू शकता ऑर्डर

सर्व ऑर्डरसह एक ओटीपीदेखील दिला जाईल. जो डिलिव्हरीच्या वेळी वेरिफाय केला जाईल. दारु किती ऑर्डर करावी यावरही मर्यादा आहे. हे सर्व राज्याने नेमून दिलेल्या नियमांवर आधारित असेल. रांचीमध्ये ग्राहक आपल्या स्विगी अपमध्ये  ‘Wine Shops’  कॅटगरीमध्ये एक्सेस करू शकतात.

गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारने दारुच्या ऑनलाईन डिलिव्हरीसाठी परवानगी दिली होती. मात्र त्यानंतर दारुच्या होम डिलिव्हरीवरुन फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत.

हे वाचा -लॉकडाऊनमुळे हरवलेले पिता सापडले, 3 वर्षांपूर्वी पडले होते घराबाहेर

मुंबईतील कांदिवली भागात हजारोंची गर्दी, 2 ट्रेन रद्द झाल्याने मजूर त्रस्त

First published: May 21, 2020, 6:51 PM IST

ताज्या बातम्या