रोहित शर्मावर मीम करण Swiggy ला पडलं महागात, ट्विटरवर ट्रेंड झाल्यानंतर मागितली माफी

रोहित शर्मावर मीम करण Swiggy ला पडलं महागात, ट्विटरवर ट्रेंड झाल्यानंतर मागितली माफी

स्विगीने (Swiggy) मॅचपूर्वी मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मावर (Rohit Sharma) एक कमेंट केली आणि ती त्यांना चांगलीत महागात पडली आहे. त्यांच्या कमेंटनंतर सोशल मीडियावर BoycottSwiggy ट्रेंड होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 एप्रिल : आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा 14 वा सीजन (IPL 2021 Season 14) सुरू झाला आहे. सर्वच टीमच्या एकेक मॅच खेळून झाल्या आहेत. सध्या पॉइंट्स टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स पहिल्या नंबरवर असून मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सला हरवून या सीजनचा पहिला विजय मिळवला आहे. मुंबई आणि कोलकाता यांच्यातील मॅच होण्याआधी ऑनलाईन फूड डिलीव्हरी ॲपवर चाहत्यांनी निशाणा साधला आहे. स्विगीने (Swiggy) मॅचपूर्वी मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मावर (Rohit Sharma) एक कमेंट केली आणि ती त्यांना चांगलीत महागात पडली आहे. त्यांच्या कमेंटनंतर सोशल मीडियावर BoycottSwiggy ट्रेंड होत आहे.

एका युजरने रोहित शर्माचं मीम सोशल मिडीयावर शेअर केलं. या मीममध्ये रोहितची बॉल पकडण्यासाठी डाइव्हिंग करत असतानाची ॲक्शन दिसत आहे. मात्र, तो बॉल नाही तर एका स्टॉलवरून वडापाव पकडण्यासाठी डायव्हिंग करत असल्याचं दाखवलं आहे. हे ट्विट रीट्वीट करून स्विगीने‘हेटर्स म्हणतील की हे फोटोशॉप आहे,’‘Haters will say it’s photoshopped!’अशी कमेंट केली आहे. स्विगीने हे मीम शेअर केल्यानंतर रोहित शर्माचे चाहते फारच चिडले आणि त्यांनी स्विगीवर टीका करायला सुरुवात केली. त्यामुळे स्विगीला हे ट्विट डिलीट करावं लागलं.

अनेक चाहत्यांनी स्विगीच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट (Screenshot) काढून शेअर केला. त्यावर काहींनी तर स्विगीचं ॲप फोनमधून अनइन्स्टॉल करणारे स्क्रिनशॉट टाकले. स्विगीने चेष्टा म्हणून शेअर केलेलं हे मीम त्यांना चांगलंच महागात पडलं आहे.

एका चाहत्यानं कमेंट केली आहे, ‘रोहित शर्मा हा भारतीय टीमचा Vice Captain असून लाखो लोकांचा आयडॉल आहे. त्याच्याबदद्ल अशा प्रकारचं मीम बनवलेलं अजिबात खपवून घेतलं जाणार नाहीत.’ तर, एकाने म्हटलंय की ‘हा आपल्या देशातील क्रिकेटर्सला बदनाम करण्याचा अजेंडा आहे आणि आपण त्याविरोधात आवाज उठवायला पाहिजे. रोहित आपल्या देशासाठी खेळतो. त्यामुळे स्विगीच्या या ट्विटचे अजिबात समर्थन करू नका.’

(वाचा - बॉल टाकण्यापूर्वीच रोहित शर्माला दुखापत; VIDEO व्हायरल)

स्विगीने आपल्या देशातील खेळाडूंचा मान राखायला हवा, असं हिटमॅनच्या चाहत्यांचं म्हणणं होतं. लोकांची स्विगीवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आणि ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड (Hashtag Trend) झाल्याने स्विगीने घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. ते म्हणाले, “हे मीम आम्ही तयार केलं नव्हतं, एका युजरने तयार केलेलं मीम आम्ही रिपोस्ट केलं होतं. यातून कोणालाही कमी लेखण्याचा आमचा हेतू नव्हता. हा फोटो वेगळ्या पद्धतीने टाकता आला असता,”असं म्हणत स्विगीने चाहत्यांची माफी मागितली.

First published: April 14, 2021, 7:07 PM IST

ताज्या बातम्या