• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Swiggyनं पनीर ऐवजी पाठवला चिकन रोल; शाकाहारी तरुणाला नॉनव्हेज खाऊ घातल्यानं धर्म भ्रष्ट

Swiggyनं पनीर ऐवजी पाठवला चिकन रोल; शाकाहारी तरुणाला नॉनव्हेज खाऊ घातल्यानं धर्म भ्रष्ट

एका तरुणानं स्वीगीद्वारे ऑनलाइन शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर त्याला मांसाहार जेवण पाठवल्याची घटना समोर आली आहे. तरुणानं चिकन रोल खाल्ल्यानंतर त्याला संशय आला.

 • Share this:
  इंदौर, 28 जून: पूर्ण दिवस उपवास केल्यानंतर सायंकाळी उपवास (Fast) सोडण्यासाठी इंदौर (Indore) येथील एका तरुणानं ऑनलाइन शाकाहारी जेवणाची ऑर्डर (Online food order) दिली. पण स्वीगीनं त्याला मांसाहाराचं पार्सल पाठवल्याची (Swiggy sent non-veg food) घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बॉयनं फिर्यादी तरुणाला पनीर रोल ऐवजी चिकन रोल आणून दिला आहे. संबंधित युवकानं चिकन रोलचा पहिला घास घेतला अन् त्याला संशय आला. त्यामुळे त्यानं तोंडात घेतलेला घास थुंकला. त्यानं मागवलेला पनीर रोल व्यवस्थित तपासला असता तो चिकन रोल असल्याचं समोर आलं आहे. ही संतापजनक घटना समोर येताच, संबंधित हॉटेल चालकानं आणि स्विगी कंपनीनं तरुणाची माफी मागितली आहे. आपण आयुष्यात पहिल्यांदाच चिकन खाल्लं असून आपला धर्म भ्रष्ट झाल्याचा दावा तरुणाकडून करण्यात आला आहे. न्यायासाठी आपण कोर्टात जाणार असल्याचं इशाराही संबंधित युवकानं दिला आहे. संबंधित पीडित तरुणाचं नाव सोनू शर्मा असून ते इंदौर डीआयजी कार्यालयात पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. 25 जून रोजी सोनू यांचा उपवास होता. शुक्रवारी दुपारी ड्युटी संपल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल सोनू शर्मा घरी परतले. ते घरात एकटेच असल्यानं त्यांनी जेवणासाठी ऑनलाइन ऑर्डर दिली. स्विगीवरून त्यांनी पनीर रोल मागवला. पण डिलिव्हरी बॉयनं त्यांना चिकन रोल आणून दिला. सोनूनं पहिला घास घेताच त्याला संशय आला. यानंतर त्यानं तपास केला असता संबंधित खाद्य चिकन रोल असल्याचं आढळलं आहे. हेही वाचा-Zomato-Swiggy च्या ऑनलाइन फूडवर सरकारची असेल नजर, नियम झाले कडक याप्रकरणी सोनून संबंधित हॉटेल चालकाकडे तक्रार केली आहे. चूक लक्षात आल्यानंतर हॉटेल चालकाकडून माफी मागण्यात आली आहे. याशिवाय सोनू यांनी आपल्या ट्वीटरच्या माध्यमातून स्वीगीकडेही तक्रार केली आहे. स्वीगीनंही आपली चूक मान्य केली असून माफी मागितली आहे. पण माझा धर्म भ्रष्ट झाला आहे, त्याच काय करायचं? असा सवाल पीडित तरुण सोनू शर्मा यांनी विचारला आहे. याप्रकरणी सोनू आता न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: