स्पामध्ये सुरू होतं SEX रॅकेट, तरुणींसोबत विवस्त्र होते लोक, अनेक कंडोम सापडले!

स्पामध्ये सुरू होतं SEX रॅकेट, तरुणींसोबत विवस्त्र होते लोक, अनेक कंडोम सापडले!

सेक्स रॅकेटवर छापे टाकल्यानंतर यातून अनेक तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 सप्टेंबर : दिल्लीमध्ये स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेक्स रॅकेटवर छापे टाकल्यानंतर यातून अनेक तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल सध्या खूप सक्रिय आहेत. मालीवाल यांनी बुधवारी दिल्लीच्या नवादा भागात दोन स्पा सेंटर ( जन्नत स्पा आणि जस्मीन स्पा) वर छापा टाकला. या स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेटवर रंगे हात छापा मारण्यात आला.

पोलिसांनी छापा मारल्यानंतर 9 तरूणींना सोडवण्यात आलं आहे. या संदर्भात स्वाती यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. तसंच या कारवाई दरम्यान स्वाती यांनी व्हिडिओही शेअर केला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी यावेळी दिल्ली पोलिस आणि एमसीडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अशा घटनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. दिल्ली पोलिस आणि एमसीडी शांत का आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे.

कंडोमही केले जप्त...!

कारवाई दरम्यान, दोन्ही स्पा पार्लरमधून अनेक आक्षेपार्ह वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. वापरलेले कंडोम आणि त्यांची अनेक पाकिटंही जप्त केली आहेत. या प्रकरणात स्वाती मालीवाल म्हणाल्या की, मसाजच्या नावाखाली दिल्लीत अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे सेक्स रॅकेट चालवली जातात. स्पाच्या प्रत्येक खोलीत निर्वस्त्र मुली आणि मुलं सापडली. त्याचवेळी मॅनेजर आणि स्वतः महिलांनी कबूल केलं की, इथ सेक्स रॅकेट चालवलं जात आहे. यानंतर स्पा मालकांविरोधात त्वरित एफआयआर नोंदवण्याची मागणी स्वाती मालीवाल यांनी केली आहे.

नवादामध्ये असलेल्या जन्नत स्पामधून 8 आणि जस्मीन स्पामधून एका मुलीची या रॅकेमधून सुटका करण्यात आली आहे. या तरुणींना जबरदस्ती सेक्स रॅकेटमध्ये ओढलं गेलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सगळ्या तरुणींना निर्वस्त्र मुलांसोबत पकडण्यात आलं. पोलिसांकडूव परिसरात चौकशी केल्यानंतर सगळ्यांकडून स्पामध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची कबूली देण्यात आली आहे.

इतर बातम्या - मुंबई: क्षुल्लक कारणावरून आई भांडली, मुलाने वृ्द्ध जन्मदातीला संपवलं!

शाळेतील एका विद्यार्थींसोबत आढळले 2 तरुण

स्वाती यांनी मारलेल्या छाप्यामध्ये जास्मीन स्पामध्ये एका शाळेतल्या विद्यार्थीनीसोबत 2 तरुणांना गैरप्रकार करताना पकडण्यात आलं. त्यांची चौकशी केली असाच आम्ही मसाज घेण्यासाठी आलो असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. पण पोलीशी खाकी दाखवताच इथे सेक्स रॅकेट सुरू असल्याची कुबुली तरुणांकडून देण्यात आली. दुसऱ्यांच्या आई-बहिणींचा असा लैंगिक छळ करणारे हे नराधम असल्याचं यावेळी स्वाती म्हणाल्या. तर पोलिसांच्या नाकावर टिचून असे धंदे सुरू आहेत पण त्याव

र कारवाई होत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

कारवाईची मागणी

स्वाती मालीवाल यांनी पोलीस आणि एमसीडीकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहलं की, सेक्स रॅकेट चालवणारी अशी अनेक स्पा सेंटर उघडपणे चालू आहेत. अशा वेळी त्यांच्यावर एफआयआर नोंदवून चौकशी केली पाहिजे. त्याचबरोबर आरोपींना अटक करावी आणि निरपराध मुलींची यातून सुटका करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.

VIDEO : दुकानाबाहेर साड्या पाहत होत्या महिला, बैलाने मागून येऊन दिली धडक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: delhi
First Published: Sep 5, 2019 01:32 PM IST

ताज्या बातम्या