मराठी बातम्या /बातम्या /देश /

Swastik Sign : 'या' कारणामुळे काही राज्यांमध्ये स्वस्तिक चिन्हाच्या वापरावर बंदी

Swastik Sign : 'या' कारणामुळे काही राज्यांमध्ये स्वस्तिक चिन्हाच्या वापरावर बंदी

हिंदू धर्मात स्वस्तिक हे विघ्नहर्त्या श्री गणेशाचं रुप मानलं जातं. स्वस्तिक चिन्हाच्या डाव्या बाजूला गं हा बीज मंत्र असतो. त्यामुळे हे श्री गणपतीचं स्थान मानलं जातं. मात्र काही राज्यांनी या चिन्हावर बंदी  घातली आहे. काय आहे यामागचं कारण जाणून घ्या.

हिंदू धर्मात स्वस्तिक हे विघ्नहर्त्या श्री गणेशाचं रुप मानलं जातं. स्वस्तिक चिन्हाच्या डाव्या बाजूला गं हा बीज मंत्र असतो. त्यामुळे हे श्री गणपतीचं स्थान मानलं जातं. मात्र काही राज्यांनी या चिन्हावर बंदी घातली आहे. काय आहे यामागचं कारण जाणून घ्या.

हिंदू धर्मात स्वस्तिक हे विघ्नहर्त्या श्री गणेशाचं रुप मानलं जातं. स्वस्तिक चिन्हाच्या डाव्या बाजूला गं हा बीज मंत्र असतो. त्यामुळे हे श्री गणपतीचं स्थान मानलं जातं. मात्र काही राज्यांनी या चिन्हावर बंदी घातली आहे. काय आहे यामागचं कारण जाणून घ्या.

पुढे वाचा ...
मुंबई, 16 ऑगस्ट: हिंदू धर्मात स्वस्तिक हे अत्यंत शुभ चिन्ह मानलं जातं. भारतात अध्यात्मिकदृष्टया स्वतिक चिन्हाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. प्रत्येक पूजाविधी किंवा शुभ कार्याची सुरुवात स्वस्तिक काढून केली जाते. पण सध्या स्वस्तिक चिन्ह जोरदार चर्चेत आलं आहे. ऑस्ट्रेलियातल्या काही राज्यांनी या चिन्हावर बंदी  घातली आहे. या राज्यांमध्ये स्वस्तिक चिन्हाचा वापर गुन्हा मानला जाणार आहे. अर्थात यामागे काही कारणं आहेत. या चिन्हाचा संबंध नाझी, हिटलर यांच्याशी असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. टीव्ही नाइन हिंदीने या विषयीची माहिती दिली आहे. हिंदू धर्मात स्वस्तिक हे विघ्नहर्त्या श्री गणेशाचं रुप मानलं जातं. स्वस्तिक चिन्हाच्या डाव्या बाजूला गं हा बीज मंत्र असतो. त्यामुळे हे श्री गणपतीचं स्थान मानलं जातं. स्वस्तिकामधील चारही बाजूला काढण्यात येणाऱ्या बिंदूंमध्ये गौरी माता, पृथ्वी, कूर्म आणि देवतांचं वास्तव्य असतं असं मानलं जातं. स्वस्तिकातल्या चारही रेषांचा संबंध ब्रह्मदेवाशी जोडला गेला आहे. त्यामुळे स्वस्तिक चिन्ह शुभ मानलं जातं. हिंदू धर्माव्यतिरिक्त जैन आणि बौद्ध धर्मातही स्वस्तिक चिन्हाचा वापर होतो. मात्र ऑस्ट्रेलियातल्या काही राज्यांनी या चिन्हाच्या वापरावर बंदी घातली आहे. हे चिन्ह जर्मनीतील नाझींशी संबंधित असल्यानं असा निर्णय घेण्यात आला आहे. जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याचं प्रतीकचिन्ही स्वस्तिकासारखंच होतं त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे. तिथं या चिन्हाचा वापर गुन्हा  ठरणार आहे. मात्र जे लोक धार्मिक कारणांसाठी या चिन्हाचा वापर करतात, त्यांना यातून सूट देण्यात आली आहे. यामध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माच्या लोकांना स्वस्तिक चिन्हाचा वापर करण्यास मुभा देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात स्वस्तिक चिन्हावर बंदी घालण्यामागं आणि या चिन्हासोबत हिटलरचं नाव चर्चेत येण्यामागं नेमकी काय कारणं आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हेही वाचा - या 4 राशीच्या मुलींचा अ‌ॅटिट्यूड असतो जरा जास्त, त्यांना इम्प्रेस करणं असतं खूप कठीण स्वस्तिक हे नाझीचं चिन्ह होण्यामागं एक कहाणी आहे. नाझी सैन्यानं आपल्या प्रतिनिधित्वासाठी आणि चळवळीसाठी हकेनक्रेजचा वापर केला. हे चिन्ह पांढऱ्या बॅकग्राउंडवर लाल रंगाने काढण्यात आलं होतं. पण ते स्वस्तिकासारखं सरळ नव्हतं, तर 45 अंशांपर्यंत झुकलेलं होतं. यामधला लाल रंग हा संघर्षाशी संबंधित होता. हिटलरने 1920 पासून त्याचा वापर सुरू केला होता. एका दृष्टीनं पाहिलं तर हिंदू धर्माचं स्वस्तिक चिन्ह हुकूमशहा हिटलरच्या नाझी सेनेच्या चिन्हासारखं दिसतं. परंतु, ते त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. स्वस्तिकासारखं दिसणाऱ्या नाझी चिन्हाला हकेनक्रेज असं म्हणतात. या हकेनक्रेजमध्ये स्वस्तिकाप्रमाणे चार बिंदू नसतात तर केवळ रेषा असतात. हिंदू धर्मातल्या स्वस्तिक चिन्हात जे चार बिंदू असतात, त्यांना वेदांचं प्रतीक मानतात. नाझी सैन्याच्या झेंड्यात या बिंदूंचा समावेश नसतो. खरं तर स्वस्तिक चिन्हावर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अनेक देशांनी स्वस्तिक चिन्हावर बंदी घातली होती. मात्र हे चिन्ह दिसायला नाझींच्या प्रतीकासारखे आहे. त्यामुळे परदेशातले लोक स्वस्तिक हे नाझींचे प्रतीक मानतात. हे हिंसेचं प्रतीक मानलं जातं आणि त्याचा संबंध कट्टरवादाशी जोडला जातो. या कारणास्तव, केवळ नाझींच्या चिन्हाशी साम्य असल्यामुळे ऑस्ट्रेलियातील काही राज्यांनी त्यावर बंदी घातली आहे. 1930 पासून, पाश्चात्य देशांमध्ये स्वस्तिक चिन्हाकडं फॅसिझमचं प्रतीक म्हणून पाहिलं जात आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, अमेरिकी सैन्याने पहिल्या महायुद्धात या चिन्हाचा प्रतीक म्हणून वापर केला होता. 1939 पर्यंत ब्रिटिश हवाई दलाच्या लढाऊ विमानांवर हे चिन्ह वापरलं जात होतं. स्वस्तिक हे चिन्ह जर्मनीत दाखल होण्यामागं एक विशेष गोष्ट आहे. जर्मन विद्वान भारतीय साहित्याचा अभ्यास करत असताना त्यांना जर्मन भाषा आणि संस्कृत भाषेत  काहीसं साम्य असल्याचं आढळून आलं. यानंतर दोघांचे पूर्वज एक असल्याचं समोर आलं. मग ज्यू लोकांना विरोध करणाऱ्यांनी या चिन्हाचा स्वीकार केला. त्यानंतर नाझींच्या ध्वजात या चिन्हानं स्थान मिळवलं.
First published:

Tags: Australia

पुढील बातम्या