Home /News /national /

Swami Chinmayanand Case: स्वामी चिन्मयानंद यांची लैंगिक शोषण प्रकरणात निर्दोष मुक्तता, वाचा कोर्टाने का दिला असा निर्णय

Swami Chinmayanand Case: स्वामी चिन्मयानंद यांची लैंगिक शोषण प्रकरणात निर्दोष मुक्तता, वाचा कोर्टाने का दिला असा निर्णय

Swami Chinmayanand Case: पुराव्याअभावी न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद उर्फ कृष्णपाल सिंह यांना अश्लीलता, अश्लील व्हिडीओ बनवण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.

    ऋषभ मणि त्रिपाठी, लखनऊ, 27 मार्च: माजी मंत्री स्वामी चिन्मयानंद (Swami Chinmayanand) यांना कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका विद्यार्थिनीबरोबर लैंगिंक संबंध प्रस्थापित करून आणि तिला कस्टडीमध्ये ठेवण्याच्या प्रकरणात लखनऊच्या एमपी एमएलए कोर्टचे विशेष न्यायाधीश पवनकुमार राय यानी पुराव्याअभावी  माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद उर्फ कृष्णपाल सिंह यांना अश्लीलता, अश्लील व्हिडीओ बनवण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. निकाल देताना कोर्टाने म्हटले आहे की फिर्यादीला आरोपींवर लावण्यात आलेले आरोप सिद्ध करता आले नाहीत. चिन्मयानंद यांचे वकील ओम सिंग म्हणाले की, बलात्कारप्रकरणी चिन्मायानंद यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. हा खटला एमपी एमएलए कोर्टात सुरू होता. 27 ऑगस्ट 2019 रोजी, एलएलएम विद्यार्थ्यीनीच्या वडिलांनी शाहजहांपुरमधील पोलीस स्टेशनमध्ये  एफआयआर दाखल केला. (हे वाचा-पुण्यातील आगीत व्यापाऱ्यांचं करोडोंचं नुकसान, 500 हून अधिक दुकानं जळून खाक) एफआयआरनुसार पीडित मुलगी एलएलएम करत होती आणि ती महाविद्यालयीन वसतिगृहात राहत होती. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की 23 ऑगस्टपासून तिचा मोबाईल बंद होता आणि तिच्या वडिलांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पाहिला होता. ज्यामध्ये विद्यार्थीनीने स्वामी चिन्मयानंद आणि इतर काही जणांवर तिचे आणि इतर काही विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. तसंच तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिने  केला होता. (हे वाचा-भाजपने कोंडी केली असताना महाविकास आघाडीत नवा वाद, Shivsena-Congress आमने सामने) वडिलांनी दाखल केला होता FIR पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले होते की, त्यांच्या मुलीवर अत्याचार करून तिला गायब करण्यात आले आहे. आणि जेव्हा पीडितेच्या वडिलांनी स्वामी चिन्मयानंद यांच्याशी मोबाइलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी कोणतेच उत्तर दिले आहे. पीडितेच्या वडिलांनी FIR मध्ये असं म्हटलं होतं की, त्यांची मुलगी एका हॉटेलमध्ये बंद होती. एका खोलीत लॉक लावून तिला ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान सुनावणीदरम्यान पीडिता आणि इतर साक्षीदारांनी साक्ष फिरवल्याने निकाल चिन्मयानंद यांच्या बाजूने देण्यात आला.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Rape case, Sexual harassment

    पुढील बातम्या