TOP 10 स्वच्छ शहरांमध्ये महाराष्ट्रातील फक्त 'हे' एकच शहर, तर इंदौर पुन्हा नंबर वन

'या' शहराने देशात सर्वात स्वच्छ शहराचा मान सलग तिसऱ्या वर्षी पटकावला.

  • Share this:

स्वच्छ भारत, सुंदर भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सलग तिसऱ्या वर्षी सर्वात स्वच्छ सुंदर शहर होण्याचा मान मध्य प्रदेशातील इंदौर शहराला मिळाला आहे.

राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देशातील सर्वात स्वच्छ शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. राष्ट्रपति भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत सुंदर शहरांच्या प्रतिनिधींनी गौरवण्यात आले.

इंदौरनंतर स्वच्छ शहरांमध्ये छत्तीसगढमधील अंबिकापूरचा दुसरा क्रमांक लागतो. कर्नाटकातील म्हैसूर शहराने तिसरे स्थान पटकावले. यानंतर उज्जैनचा नंबर लागतो. देशाची राजधानी दिल्ली या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

इतर विभागातील शहरामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात अहमदाबादचा पहिला नंबर लागतो. तर वेगाने लोकसंख्या वाढणाऱ्या शहरांमध्ये रायपूरचे स्थान पहिले आहे.

तीन लाखांपेक्षा जास्त आणि 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात उज्जैन एक नंबरवर आहे. तर 1 ते 3 लाख लोकसंख्येच्या शहरात राजधानी दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे.

देशातील सर्वात स्वच्छ शहरांची नावे पुढीलप्रमाणे : 1. इंदौर, मध्यप्रदेश,  2. अंबिकापुर, छत्तीसगढ़,  3. म्हैसूर, कर्नाटक, 4. उज्जैन, मध्यप्रदेश,  5. नवी दिल्ली,  6. अहमदाबाद, गुजरात, 7. नवी मुंबई, महाराष्ट्र 8. तिरुपति,  9. राजकोट, गुजरात 10. देवास, मध्यप्रदेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2019 02:07 PM IST

ताज्या बातम्या