Home /News /national /

स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूर पहिल्या स्थानावर, वाचा मुंबई कितव्या स्थानावर

स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूर पहिल्या स्थानावर, वाचा मुंबई कितव्या स्थानावर

स्वच्छ शहर सर्व्हेक्षणात पहिली 20 शहरं कोणते आहेत वाचा.

    नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : केंद्र सरकारकडून दरवर्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ भारत सर्व्हेक्षण होत असतं. यंदा या सर्व्हेक्षणाचं पाचवं वर्ष आहे. सलग चौथ्यांदा या सर्व्हेक्षणात पहिलं स्थान मिळवण्याचा मान इंदूर शहरानं पटकावला आहे. देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून मध्य प्रदेशातील इंदूरनं स्वच्छ भारत सर्व्हेक्षण 2020 मध्ये पहिलं स्थान मिळवलं असून दुसऱ्या स्थानावर गुजरातमधील सूरत तर तिसऱ्या स्थानावर नवी मुंबई आहे. या सर्व्हेक्षणात मध्ये प्रदेशातील चार शहरांनी भाग घेतला होता आणि या 4 ही शहरांचा पहिल्या 20 मध्ये समावेश आहे. स्वच्छ शहर सर्व्हेक्षणात पहिली 20 शहर कोणते आहेत वाचा. 1. इंदूर 2. सूरत 3. नवी मुंबई 4. विजयवाडा 5. अहमदाबाद 6. राजकोट 7. भोपाल 8. चडीगढ़ 9. विशाखापत्तनम 10. वडोदरा 11. नाशिक 12. लखनऊ 13. ग्वालियर 14. ठाणे 15. पुणे 16. आगरा 17. जबलपुर 18. नागपूर 19. गाजियाबाद 20. प्रयागराज स्वच्छ भारत सर्व्हेक्षणात 2020 मध्ये महाराष्ट्रातील 5 शहरांचा समावेश आहे. नाशिक, नागपूर, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे. या पाच शहरांपैकी नवी मुंबई तिसऱ्या तर नाशिक 11 व्या स्थानावर आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Indore

    पुढील बातम्या