दिल्लीत 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू

30 नोव्हेंबरला संसद घेराव आंदोलनात सहभागी होण्यासाठी रेल्वेची विशेष गाडी आली होती.

News18 Lokmat | Updated On: Dec 1, 2018 06:28 PM IST

दिल्लीत 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू


दिल्ली, 01 डिसेंबर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याचा दिल्लीतील आंबेडकर भवनाच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी दिल्लीत आयोजित केलेल्या किसान रॅलीसाठी आले होते.

किरण गौरवाडे असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. तोल गेल्याने पहाडगंज येथील आंबेडकर भवनाच्या तिसऱ्या मजल्यावरून ते खाली पडले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. संध्याकाळी गौरवाडे यांचं पार्थिव कोल्हापूर इथं विमानानं पाठवण्यात आले.

30 नोव्हेंबरला संसद घेराव आंदोलनात सहभागी होण्यासाठी रेल्वेची विशेष गाडी आली होती. यात शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते किरण गौरवाडे हे दिल्लीला आले होते. काल मोर्चा झाल्यानंतर संध्याकाळी आंबेडकर भवनात त्यांचा मुक्काम होता. मध्यरात्री भवनावर तोल जाऊन ते खाली पडले यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या मृत्यूमुळे स्वाभिमानी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. या आंदोलनात किरण गौरवाडे यांचं निधन झालं, त्यांचं बलिदान व्यर्थ जावू देणार नाही अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली.


Loading...

=========================बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2018 06:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...