दिल्लीहून परतणारी 'स्वाभिमानी' एक्स्प्रेस भरकटली

प्रवाशांना 160 किलोमीटरचा जादा प्रवास सर्वांना करावा लागलाय. दिल्लीमधल्या आंदोलनासाठी ही स्वाभिमानी एक्सप्रेस गेली होती. दिल्लीमधून परत येताना रेल्वे मार्ग चुकला, मध्यप्रदेशात मार्ग चुकल्याने गाडी 7 तास उशिरा येणार आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2017 10:42 AM IST

दिल्लीहून परतणारी 'स्वाभिमानी' एक्स्प्रेस  भरकटली

  22 नोव्हेंबर : राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाच्या  कार्यकर्त्यांना परत आणणारी स्वाभिमानी एक्स्प्रेस मध्य प्रदेशमध्ये भरकटली आहे. हे कार्यकर्ते दिल्लीला देशव्यापी शेतकरी मोर्च्यामध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते.

दिल्लीहून परत येताना मार्ग चुकल्याने खळबळ उडाली  आहे. 160 किलोमीटरचा जादा प्रवास सर्वांना करावा लागलाय.

दिल्लीमधल्या आंदोलनासाठी ही स्वाभिमानी एक्सप्रेस गेली होती. दिल्लीमधून परत येताना रेल्वे मार्ग चुकला, मध्यप्रदेशात मार्ग चुकल्याने गाडी 7 तास उशिरा येणार आहे. गाडीमध्ये कोल्हापूर भागातील हजारो शेतकरी आहेत. ग्वाल्हेरजवळ शेतकऱ्यांनी मालगाडी अडवली. रेल्वे प्रश्नासाने चूक कबुल केली आहे. चुकीच्या सिग्नलमूल रेल्वे भरकटली आहे. ही गाडी आज कोल्हापूरला पोहोचणार होती, ती आता उद्या पोहोचेल. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आहे.

20-21 नोव्हेंबरला देशव्यापी शेतकी आंदोलन दिल्लीत झालं होतं. या आंदोलनाना देशभरातून शेतकरी गेले होते. कोल्हापूरहूनही ट्रेनमध्य बसून अनेक शेतकरी गेले होते. दरम्यान राजू शेट्टी या ट्रेनमध्ये नसल्याची माहिती मिळते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2017 10:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...