'स्वाभिमान' पक्षाच्या अध्यक्षाची महिलांनी चप्पल आणि बेल्टनं केली धुलाई, पाहा VIDEO

'स्वाभिमान' पक्षाच्या अध्यक्षाची महिलांनी चप्पल आणि बेल्टनं केली धुलाई, पाहा VIDEO

पक्षाच्या कार्यालयात महिलांचं शोषण होत असल्याचा आरोप या महिलांनी केला.

  • Share this:

सूरत, 12 सप्टेंबर : महिलांनी स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयात घुसून अध्यक्षासह उपस्थितांना बेदम मारहाण केली आहे. याशिवाय कार्यालयातील वस्तूंची तोडफोड केल्याची घटना गुजरातच्या सूरतमधून समोर आली आहे. पक्षातील अध्यक्षासह इतर उपस्थितांना देखील मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

महिलांवर अत्याचार केल्याचा दावा करत काही महिलांनी स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयात घुसून अध्यक्षासह उपस्थितांना बेल्ट आणि चपलेनं मारहाण केली आहे. याचा व्हिडीओ सोशल मी़डियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आणि उधरा पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.

हे वाचा-एकूलत्या एका लेकराचीही अज्ञातांनी केली निर्घृण हत्या, भिवंडीमध्ये धक्कादायक घटना

या पक्षाचं कार्यालय सूरतमधील उधा रेल्वेस्थानकाजवळ आहे. या कार्यालयात पक्षाध्यक्ष चंद्रभान सोनवणे आरामात बसले होते त्याच दरम्यान तीन ते चार महिला या कार्यालयात घुसल्या आणि आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांनी कार्यालयाची तोडफोड करत उपस्थितांना मारहाण केली. चप्पल, खुर्ची बेल्ट मिळेल त्याने पक्षाध्यक्षाची धुलाई या महिलांनी केली आहे.

पक्षाच्या कार्यालयात महिलांचं शोषण होत असल्याचा आरोप या महिलांनी केला. याचा आक्रोश करण्यासाठी महिलांनी अखेर कायदा हातात घेतला. या प्रकरणी मोठी खळबळ उडाली असून उधमपूर पोलिसांनी मध्यस्ती करत हे प्रकरण शांत केलं. तोडफोड करणाऱ्या महिला आणि स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सोनवणे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 12, 2020, 9:12 AM IST

ताज्या बातम्या