Home /News /national /

श्रीकृष्णाच्या मंदिरात अर्पण केलेल्या ब्रँड न्यू SUV चा होणार लिलाव, मंदिर प्रशासनाने घेतला निर्णय

श्रीकृष्णाच्या मंदिरात अर्पण केलेल्या ब्रँड न्यू SUV चा होणार लिलाव, मंदिर प्रशासनाने घेतला निर्णय

SUV offered to Lord Krishna Temple: लाल रंगाची ही एसयूव्ही मंदिरात अर्पण केल्यामुळे चांगलीच चर्चेत राहिली होती. आता मंदिर प्रशासन या गाडीचा लिलाव करण्याच्या विचारात असल्याचे समोर आले आहे.

    नवी दिल्ली, 11 डिसेंबर : केरळच्या थ्रिस्सूर जिल्ह्यात असणारे गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिर (Guruvayur Krishna Temple) हे तिथे देवाला वाहिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी इतर मंदिरांप्रमाणे देवाला सोन्याचे दागिने अर्पण करतातच, पण त्यासोबतच कित्येक भक्त रॉ प्लॅटिनम, साखरेची पोती आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या वस्तूही अर्पण (Offerings to Guruvayoorappan) करतात. काही दिवसांपूर्वी देशातील मोठी ऑटोमोबाईल कंपनी असणाऱ्या महिंद्राने तर आपली थार एसयूव्ही गुरुवयूरप्पन देवाला, म्हणजेच कृष्णाला अर्पण (Mahindra Thar SUV offered to Guruvayoorappan) केली होती. लाल रंगाची ही एसयूव्ही मंदिरात अर्पण केल्यामुळे चांगलीच चर्चेत राहिली होती. आता मंदिर प्रशासन या गाडीचा लिलाव करण्याच्या विचारात असल्याचे समोर आले आहे. महिंद्राने आपली ही नवीन एसयूव्ही लाँच होण्यापूर्वी मंदिरात अर्पण केली होती. यामुळे महिंद्रा कंपनीचे बऱ्याच प्रमाणात ट्रोलिंगही झाले. पण आता या कारचे मंदिर प्रशासन काय करणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. गुरुवायूर मंदिर हे केरळ आणि तमिळनाडूमधील हिंदूंचे एक मोठे श्रद्धास्थान आहे. केरळ सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या गुरुवायूर देवस्थानामार्फत या मंदिराची देखरेख करण्यात येते. मंदिर प्रशासनाने आता या एसयूव्हीचा लिलाव (Guruvayoorappan SUV on auction) करण्याचा निर्णय घेतला आहे. 18 डिसेंबर 21 ला मंदिर परिसरातच हा लिलाव पार पडणार आहे. लाल रंगाच्या या थार एसयूव्हीसाठी बेस प्राईज 15 लाख ठेवण्यात आली आहे. वाचा : 'हुंडा फॉर्च्युनर' प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणाने गाडीला नकार दिल्याची क्लिप समोर महिंद्रा लाईफस्टाईल एसयूव्ही ही मार्केटमध्ये आल्यापासूनच सर्वांच्या चर्चेचा भाग झाली आहे. गाड्यांची आवड असणाऱ्या कित्येकांना या मॉडेलने भुरळ घातली आहे. मंदिरात अर्पण करण्यात आलेले मॉडेल हे लिमिटेड एडिशन आहे आणि त्याचे ऑफिशिअल लाँच अजून झाले नाही. मंदिरामध्ये अनोखे दान मंदिरांमध्ये अनोख्या गोष्टी अर्पण होण्याबाबत चर्चा सुरू असताना, कर्नाटकातील एक उदाहरणही सांगता येईल. काही दिवसांपूर्वीच एका 65 वर्षांच्या महिलेने आपल्या आयुष्याची सर्व कमाई कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यात असणाऱ्या अंजानेया मंदिरात दान केली होती. केम्पाज्जी असं या महिलेचं नाव आहे. कदूर गावातील साई मंदिराबाहेर भाविकांकडे भिक्षा मागून त्या राहत होत्या. त्या जेव्हा अंजानेया मंदिरामध्ये दिसल्या, तेव्हा कित्येक लोकांना त्या तिथेही भीक मागण्यासाठी आल्या आहेत असं वाटलं. त्यामुळे या लोकांनी त्यांना मंदिरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मंदिरात आपल्याकडील पैसे दान केल्याचे पाहून सर्वच चकित झाले होते. विशेष म्हणजे त्यांच्या या कृत्यानंतर तेथील लोक केम्पाज्जींसोबत सेल्फी घेताना दिसून आले.
    First published:

    Tags: Car, Kerala, Temple

    पुढील बातम्या