स्टेशन मास्टरच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहासह तिघांना घेतलं ताब्यात

स्टेशन मास्टरच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहासह तिघांना घेतलं ताब्यात

रेल्वे स्टेशन मास्टरच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर घाईने अंत्यसंस्कार करत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

  • Share this:

पटना, 02 मे : बिहारमधील मुजफ्फरमपूर इथं एका रेल्वे स्टेशन मास्टरच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. स्टेशन मास्टरला त्याच्या दोन सहकाऱ्यांसह अटक घेतली आहे. पोलिसांनी जळलेला अर्धवट मृतदेहसुद्दा जप्त केला आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर शंभू कुमार त्याच्यासोबत असलेल्यांसह गडबडीत पत्नीवर अंत्यसंस्कार करत होता.

काजी मोहम्मदपूर ठाण्याच्या हद्दीतील इमली गाछी रेल्वे गाछी कॉलनीत ही घटना घडली. मुजफ्फरपूरमध्ये ड्युटीवर असलेला स्टेशन  मास्टर शंभू कुमार जवळच्या रेल्वे कॉलनीत राहतो. त्याच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याची माहिती इतर कोणाला न देता काही सहकाऱ्यांच्या मदतीने अंत्यंस्कार केले.

दरम्यान, शेजाऱ्यांनी याची माहिती शंभू कुमारच्या पत्नीच्या भावाला दिली. भावाने काजी मोहम्मदपुर पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिस शंभुच्या घरी गेली तेव्हा तो स्मशानभूमीत गेल्याचं समजलं. तिथून पोलिसांनी थेट स्मशानाकडे धाव घेत शंभूसह दोघांना ताब्यात घेतलं.

पाहा VIDEO : लॉकडाऊन असतानाही सरकारी शाळेत घुसला सिंह, डरकाळीने हादरलं अख्ख गाव!

पोलिसांनी सांगितले की, प्रकरण संशयास्पद आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळ ते स्मशानभूमी याठिकाणी तपासणी करेल. शंभुने दिलेल्या माहितीनुसार तो ड्युटीवर गेला होता. त्यानंतर पत्नीचा मृत्यू झाल्याचं समजलं. मात्र त्यानं याची माहिती पत्नीच्या सासरी किंवा पोलिसांना न दिल्यानं संशय व्यक्त केला जात आहे.

हे वाचा : ड्रायव्हरच्या पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; तहसीलदार, BDO सह 16 जण क्वॉरंटाईन

First published: May 2, 2020, 10:44 PM IST
Tags: india

ताज्या बातम्या