मराठी बातम्या /बातम्या /देश /पत्रकार सुलभ श्रीवास्तव यांचा संदिग्ध मृत्यू, आधीच दिली होती जीवाला धोका असल्याची माहिती

पत्रकार सुलभ श्रीवास्तव यांचा संदिग्ध मृत्यू, आधीच दिली होती जीवाला धोका असल्याची माहिती

मागील काही वर्षात उत्तर प्रदेशात अनेक पत्रकारांच्या हत्या किंवा संदिग्ध मृत्यू झाले आहेत. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगढ (Pratapgarh) येथील एका पत्रकाराचा संदिग्ध मृत्यू (Suspicious death of journalist) झाला आहे.

पुढे वाचा ...

प्रतापगढ, 14 जून: मागील काही वर्षात उत्तर प्रदेशात अनेक पत्रकारांच्या हत्या किंवा संदिग्ध मृत्यू झाले आहेत. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगढ (Pratapgarh) येथील एका पत्रकाराचा संदिग्ध मृत्यू (Suspicious death of journalist) झाला आहे. सुलभ श्रीवास्तव (journalist Sulabh Srivastava) असं या पत्रकाराचं नाव असून ते एबीपी या वृत्तवाहिनीसाठी काम करत होते. काल सायंकाळी कटरा रोडवरील एका विट भट्टीच्या ठिकाणी सुलभ श्रीवास्तव गंभीर जखमी अवस्थेत आढळले होते. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता, त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

काही दिवसांपूर्वी मृत श्रीवास्तव यांनी एक पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. सुलभ यांनी 12 जून रोजी ADG आणि एसपी यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. जिल्ह्यातील दारू माफियाविरोधात बातमी केल्यानं आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं होतं.

काल सायंकाळी आपल्या सहकाऱ्यासोबत एक बातमी करून परत येत असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पण कुटुंबीयांनी त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. सुलभ यांच्या मृत्यूमागे काहीतरी मोठं काळंबेर असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

हे ही वाचा- अहमदनगरमध्ये पत्रकाराची अपहरण करून निर्घृण हत्या, जिल्ह्यात खळबळ

या घटनेची माहिती देताना मृत सुलभ यांच्या एका सहकाऱ्यानं सांगितलं की, 'काल सायंकाळी आम्ही एक बातमी कव्हर करून घरी परतत होतो. मृत सुलभ आमच्या पाठीमागून आपल्या दुचाकीवर येतं होते. आम्ही काही अंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला एक फोन आला की, सुलभ यांचा अपघात झाला आहे. आम्ही त्वरित माघारी फिरलो. यावेळी सुलभ हे जखमी अवस्थेत कटरा रोडवरील एका विटभट्टीजवळ जखमी अवस्थेत पडले होते. त्यांना आम्ही त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र याठिकाणी उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.'

First published:
top videos

    Tags: Crime news, Uttar pradesh